Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी क्रिकेटरला कोर्टाने सुनावली तुरुंगाची शिक्षा

Webdunia
बुधवार, 17 एप्रिल 2024 (19:36 IST)
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल स्लेटर वर माजी दिग्गजांवर लोकांवर हल्ला करणे, त्यांना धमकावणे आणि त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. स्लेटरवर एक-दोन नव्हे तर डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो अनेकांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करायचा, शारीरिक इजा करायचा. याच कारणामुळे न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे. याआधीही त्याला सोमवारी क्वीन्सलँडच्या मारूचीडोर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाने या खेळाडूला शिक्षा सुनावली आहे.

स्लेटरवर 5 डिसेंबर ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 19 आरोप ठेवण्यात आले होते. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा त्यांच्या करोडो चाहत्यांना धक्का बसला. कोट्यवधी चाहते स्लेटरला आपला आदर्श मानतात, पण त्याच्यावरील आरोपही चाहत्यांना पटलेले नाहीत. विशेष म्हणजे न्यायालयानेही हे आरोप खरे मानून त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. स्लेटरने 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो 2003 पर्यंत क्रिकेट खेळत होते. माजी क्रिकेटपटू समालोचकही राहिले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 74 कसोटी सामने आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या खेळाडूच्या नावावर कसोटीत एकूण 5312 धावा आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 14 शतके आणि 21 अर्धशतकेही झळकली आहेत. तो एक उत्कृष्ट कसोटीपटू होता, पण आता त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments