बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत आयपीएल २०२० चं आयोजन करण्याची इच्छा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलसाठी संभाव्य वेळापत्रक तयार केले गेले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यानचा ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन बीसीसीआयने हे वेळापत्रक तयार केले आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी -२० वर्ल्डकप रद्द झाला तरच आयपीएल होऊ शकतो. तसेच हा आयपीएल देशाबाहेर होऊ शकतो. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काही प्रसारक वेळापत्रकावर खुश नाहीत. दिवाळीच्या आठवड्यात 14 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल सामने झाले पाहिजे अशी स्टारची इच्छा आहे. स्टार इंडियाला दिवाळीचा आठवडा जाहिरातींसाठी वापरायचा आहे.
बीसीसीआयच्या वेळापत्रकांना विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, दुपारी आयपीएल सामने होणार आहेत, ज्याचा रेटिंगवर परिणाम होईल.