Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदाबाद जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

Webdunia
अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जात आहे. नुकतेच गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तब्बल ७०० कोटींचा अंदाजित खर्च असणारे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम ठरणार असल्याचा दावा नाथवानी यांनी केला आहे. स्टेडियममध्ये एकूण ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रुम, क्लब हाऊस, ऑलिम्पिकच्या दर्जाचे स्विमिंग पूल आहेत.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सध्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची तब्बल ९० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसनक्षमता ६६,००० इतकी आहे. २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आलेल्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमचे डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्ट पॉप्युलर कंपनीलाच अहमदाबादमधील स्टेडियमच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात या स्टेडियमची निर्मिती पूर्ण होण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संख्या सांभाळून त्यांच्या सुरळीत प्रवेशाचा आणि ट्राफीकच्या समस्या उद्भवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात येत आहे. स्टेडियमची उभारणी तीन टप्प्यात करण्याचा गुजरात क्रिकेट असोसिएशनचा मानस आहे.
 

CSK vs LSG: लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला

T20 विश्वचषकाबाबत सुनील नारायणची मोठी घोषणा

आक्षेपार्ह भाषणप्रकरणी नितीश राणे आणि गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप 200 पण पार करणार नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा,राज्य सरकारचा निर्णय

CSK vs LSG: लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला

T20 विश्वचषकाबाबत सुनील नारायणची मोठी घोषणा

T20 World Cup चा टीझर रिलीज

T20 World Cup 2024: या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यात होणार मोठा सामना

IPL 2024: विराट कोहलीला नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल दंड लागला

पुढील लेख
Show comments