Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सासू-सून' घरातल्या मैत्रिणी

Webdunia
NDND
रविवारला दूरदर्शनवर सकाळी 11 वाजता टेलिफिल्म सुरू होती. ' हुंडाबळी' हा विषय भारतीयांसाठी आता काही नवा राहिलेला नाही. रोज उगवत्या सूर्याबरोबर कितीतरी नवविवाहीतांच्या जीवनाचा अस्त झालेला असतो. त्या वेळेपुरतं त्या दिवसापुरतं फारच नजीकचं प्रकरण असेल तर तिची राख विसर्जित होईपर्यंत आपल्या मनाला क्लेश होतात. वाईट वाटतं. भयंकर चीड येते. ही प्रकरणे धसासलावून त्या अपराध्यांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत ही जिद्द आपण मनी बाळगतो. पण हळूहळू या वाईट वाटण्यावर चीड येण्यावरसुध्दा राख जमते. आपण सगळे आपल्या उद्योगात, आपल्या व्यापात, आपल्या मन:स्तापात परत मश्गूल होतो. कारण हुंडाबळीची अवस्था आ ज 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी झाली आहे. याच नियमानुसार रविवारचं नाटक घरातली कामं आटोपता आटोपता मी बघत होते. त्यावर अधूनमधून आम्हा दोघांच्या प्रतिक्रिया पण सुरू होत्या. नाटक बघतांना आमच्या मुलांचा मित्रपरिवार सोबत होताच.

नाटक संपताच आमची 8 वर्षीय स्विटी लगेच म्हणाली, ' बघा, पप्पा म्हणून तर म्हणते की, मी मुळीच लग्न करणार नाही' अग पण तुला लग्न न करायला काय झालय? पण हे नवरे लोक ‍आणि सासू फार खराब असतात 'का बरं'? अहो पपा, नेहमी आपण टी.व्ही. वर बघत नाही काय का सासू आणि नवरे कसे नेहमी मुलींना त्रास देतात. आपण तर मस्त शिकू आणि नोकरी करू बुवा. लग्न तर मुळीच करणार नाही.
' मग तू राहशील कुणाजवळ?'
NDND
' मम्मीजवळ, मी मस्त सर्व्हिस करेल, माझा पगार मम्मी जवळ देत जाईल, मग तुम्ही, मम्मी आणि मी आपण मस्त राहात जाऊ.'
' खरंच पोरी, तू खूप शिक हं, लग्न केले की शिक्षणाकडे दुर्लक्षच होतं' मी उत्तरले.
' नाही गं, स्विटे अगं लग्न केल्यावर किती मजा येते, बालीताईची पहा बरं कशी मज्जा आहे'.
' पण तिला सासू नाहीना, म्हणून' अरे दादा मुलींना जाळण्यात सासूच तर पुढे असते ना'.
' हो गं, त्या ' आव्हान' मध्ये नाही का तिला सासूनीच जाळले' स्विटीची मैत्रीण बबुची पुस्ती.
अग पण सगळ्यांचीच सासू किंवा नवरे वाईट नसतात. आपली बाई आजी आहे कां अशी वाईट?

' हो गडे, आपली बाई आजी एकदम छान आहे. तिच्यासारखी सासू जर मला मिळाली तर मग मी लग्न करेल. आपण असं करू पपा, मी ज्याच्याशी लग्न करेल त्याला आपण आपल्याच घरी घेऊन येऊ या. म्हणजे मग तो मला तुमच्यासमोर कसा मारू शकेल?' आणि समजा त्यांनी मला मारलं तरी मी तुम्हाला त्याचं नाव सांगेल. मग तुम्ही त्याला चांगलं बदडायचं आणि घरातून हाकलून द्यायचं.
' वा, वा छान कल्पना आहे. चला जेवायलाचला'.
वरील संपूर्ण संवाद हा सात ते दहा वयोगटातील मुलांचा होता. मुलं रोज दूरदर्शनवर ते बघतात, पेपरला रोज ज्या बातम्या वाचतात, किंवा त्यांच्या आसपास सुध्दा रोज जे घडतं त्यावरून त्यांचं लग्नाविषयी बनलेलं हे मत त्यांच्या निरागस बालमनावर सासूचं जे चित्र ठसलेलं आहे ते इतकं भयंकर आहे की, त्यांच्या ताईला सासू नसेल तर ती ताई लकी ठरते.

NDND
आजच्या प्रत्येक हुंडाबळी प्रकरणात सासूचा सिंहाचा वाटा असतो. नवविवा‍‍हित स्त्रीला पती जेवढा आपला वाटतो तेवढी सासू आपली कधीच वाटत नाही. सासू अशिक्षित होती, त्याकाळात सुनेला कामापुरतं छळणं एवढच तिचं काम होतं. वाट्टेल तेवढी कामं सुनेकडून करून घेण्यातच तिला एकप्रकारचा आसुरी आनंद मिळायचा. पण आज सासू सुध्दा सुशिक्षित झाली आहे. तिचा राहणीमानाचा दर्जा वाढला आहे. तिची सून जर दिवसभर घरकामातच राहिली तर तिच्या (सासूच्या) मै‍त्रिणींमध्ये तिचे प्रेस्टीज कमी होईल आणि आधुनिक युगानुसार तिचं त्रास देणंही आधुनिकच व्हायला हवं ना?स्वत:ची स्वत:च्या मुलांची ऐपत नसतांना सुनेकडूनच अमूक अमूक वस्तू मिळायला हव्यात' ही जी भावना आहे, तेच मुळात अतिशय संतापजनक आहे. त्यातून ही भावना एका स्त्रीचीच असावी हे आणखीनच वाईट आहे.

NDND
खरं म्हणजे स्त्री त्यागाचं प्रतीक, स्त्री म्हणजे प्रेमळ मंगलमूर्ती, वगैरे वगैरे स्त्रीला संस्कृतीनी किती महान बनवलयं. स्त्रीला देवाची उपाधी दिली. आज सतत आपण स्त्रिया अत्याचारपीडीत आहेत असं म्हणतो. अगदी शंभर टक्के सत्य आहे. परंतु या देशातल्या 60 टक्के स्त्रिया या केवळ स्त्री अत्याचारपीड‍ित आहेत. असं विधान आज मला करावसं वाटतं.

अनेक घरातून पती आँफिसमध्ये गेला की, सासू सुनेला या ना त्या कारणांनी छळत असते. ज्या घरात सासू स्वभावाने गरीब, शांत, समजूतदार असेल तिथे सून आपल्या अधिकाराचा वापर करून सासूला छळत असते. पुष्कळदा सुनांना घरात सासरे चालतात, पण सासू म्हटलं की, अंगावर पाल पडल्यागत तिचं शरीर बहारतं. हा एकमेकींचा दु:स्वास का? जी आई आपल्या मुलाच्या लग्नाची गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत असते, तीच आई सासू झाल्याबरोबर एकदम अशी दुर्गेचा अवतार धारण करीत असावी?

दुसरीकडे जी मुलगी स्वत:च्या आईला सोडतांना धाय मोकलून रडत असते, ती मुलगी सासूला आईच्या रूपानं का स्वीकारू शकत नाही. दोघींजवळ फक्त परस्परांना समजून घेण्याची कुवत असायला हवी. सासूनी थोडं दोन घरं मागे जाऊन सुनेला दीड घर पुढे जाऊ देण्याची मुभा दिली आणि सुनेनी सासूला फक्त 'माझ्या पतीची आई म्हणजेच माझीही कुणीतरी एवढी भावना सतत मनात तेवत ठेवली तरी हा गुंता अर्धा-अधिक सुटू शकतो. आपल्या मुलांचा संसार आपणच फुलवायचा. आपला अभिमान सोडून सुनेच्या माहेरी उगाच कशाला हात पसरायचा?

हा स्वाभिमानाचा मंत्र प्रत्येक सासूनी अर्थातच पतीनीसुध्दा जपला तर आपले ‍आणि आपल्या सुनेचेही जीवन सुखकर होईल. सून ही कुठूनतरी आणून ठेवलेली वस्तू नव्हे तर ती माझ्या मुलाच्या जीवनाची ज्योत आहे. आमच्या घरातली ती एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे, हे विचार जर घराघरातून जागृत झाले तरच प्रत्येक दिवशीच्या हुंडाबळीच्या घटनांनी आवर बसेल.

NDND
अर्थात, सासूसोबतच सुनेनीसुध्दा आपली बाजू नीट सांभाळायला हवी. अनेक घरातून सून नोकरी करणारी असेल तर सासूला चक्क मोलकरणीचं रूप आलेलं असतं, हातीपायी वस्तू द्यायला, सुनांना सतत सासूच हवी असते, ' अहो स्वयंपाक आटोपला नाही का?' माझा डबा भरला नाही, माझी पर्स कुठे आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न अनेक घरातून सुना सासवांवर सारख्या करत असतात.

एकीकडे सासू-सून या दोघींनीही त्या घरात पाया आणि छप्पर सारखंच महत्त्वाचं स्थान आहे. दोघींनीही आपापली भूमिका समजावून घेतली तरी एकमेकींच्य ा 'मैत्रिणी' ही फारच स्वप्नवत कल्पना असली, तरी आपण दोघीही स्त्रिया आहोत, एवढं जरी भान ठेवलं तरी दोघींचाही प्रवास रम्य होईल, सुखाचा होईल.

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

Show comments