Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अडला हरी गाढवाचे पाय धरी

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (21:21 IST)
बर्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता पेटलेल्या राजकिय वातावरणात अक्षरः होरपळून निघालेली आहे. निवडणूक आली की राजकिय वातावरण तापतच पण सध्याचे राजकारण म्हणजे अडला हरी अन गाढवाचे पाय धरी अशीच आहे.निवडणूक काळात कोण कुणा बरोबर युती करेल हे सांगताच येत नाही.सध्या शिवसेनेला खुप वाईट दिवस आले आहेत. आज बाळासाहेबांच्या पवित्र स्मृती पित्यर्थ शिवसेनेची अशी स्थिती बघून बाळासाहेबही खुप रडले असतील .एकेकाळा हिंदूत्वाचा प्रखर ज्वाला पेटवून देणारे बाळासाहेब जरी हयात नसले तरी सेनेची जबाबदारी उद्धवसाहेब व्यवस्थित पेलू शकले नाही.हा धनुष्य उचलण्यासाठी एखाद्या रामानेच बाळासाहेबांनंतर हे कार्य करायला हवं ॽ कोण हा धनुष्य उचलेल. कारण शिवसेना चालवण एवढ सोप काम नाही. बाळासाहेबांसारखा कुणी जादूई किमयागार प्रखर हिंदूत्ववादी व्यक्तिमहत्वच महाराष्ट्रात नाही असच दिसत आहे.सार्या गोष्टी येणारा काळ बरोबर सांगेलच पण नवी दिशा नवी आशा देणारा कुणीतरी शिवसैनिकांना हवाच.उद्धवजींचे नेतृत्व शिवसेना विधिमंडळ पक्षाने पुरतच नाकारलय अन गणित जुळवण्याच्या नादात अन मुख्यमंत्री पदाच्या नादात शिवसेना पुर्ण संपण्याच्या मार्गावर आली आहे.
 
सर्व काही जनतेसमोर आहे.अडीच वर्षानंतर भाजप बरोबर आलेले पण अन सत्तेतून बाहेर पडलेले पण या दोघांचीही काय परिस्थिती झालीय.निवडणूक आयोगाने एक घाव दोन तुकडे केले अन एका दिवसात महाराष्ट्रात दोन पक्ष निर्माण झाले.भविष्यात दोन पक्ष कधी एकत्र येतील सांगता येत नाही. पण सत्तेच्या लालसेतून एक गट बाहेर आलेला नाही तर कॉंग्रेस राष्ट्रवादी किती घातक आहे हे समजल्यावर त्याची जाणिव झाल्यावर वेगळा गट स्थापन करुन शिंदे सरकार अस्थित्वात आलं.फडणवीस शिंदे एकत्र आले अन सरकार स्थापन झाले पण हे शहाणपण अडीच वर्षात आल नसेल अस सद्यपरिस्थितीत वाटत नाही.पक्ष चिंतेपोटी  पक्षच्या भल्यासाठी केलेलं शहाण पण आज उदधवसाहेबांना कधी समजेल.ॽकि समजणारच नाही. उदधव साहेबांनी एक पाऊल मागे येत पक्ष हित बघून सारासार विचार करण्याची गरज आहे. नाहीतर कित्येक पक्षातून बाहेर पडले पण शेवटी आहे त्या ठिकाणीच राहव लागलय. रॉका कॉंग्रेस हे स्वार्थी राजकारणी अन भाजपला शहाणपण शिकवण्याच्या नादात आपलाच ह्रास होत आहे हे उद्धवजींना का समजत नसावंॽ यावरुन समजत कि उद्धव जी अजून ही जाणते ऱाजकारणी झालेले नाहीत.त्यांनी त्यांच्या मित्राकडून थोडी कुटील निती शिकून ह्यावी भविष्यात फार कामी येईल नाही तर भविष्यात राज साहेबांसारखी परिस्थिती होईल .राजकिय राजकारणात आपली स्थिती ओळख णारे अन महाराष्ट्रातील राजकारणाची नसननस ओळखणारे चाणाक्य पवार साहेब ह्यांनी बरोबर डाव साधत कुटील कारस्थान करुन महाराष्ट्रातील सत्ता मिळवली अन भविष्याचा वेध जानणारे पवार साहेब यांनी बरोबर राज अन उद्धव यांना हाताशी धरुन भाजपला हरुवण्याची कुटील निती आखलेली आहे.
 
भाजप बरोबर राहून शिवसेनेचा कधीच ह्रास झाला नाही पण  अडीच वर्षात पक्ष तर गेलाच पण चिंन्हही गेलं तेव्हा उद्धव साहेबांनी पवार साहेबां प्रमाणे भविष्याच वेध ओळखून आपली निती ठरवली पाहीजे नाहीतर आज राज व्हायला वेळ लागणार नाही. 
 
राजसाहेबांकडे उद्धवसाहेबांपेक्षा कितीतरी चांगले गुण आहेत.भाषण कौशल्य बाळासाहेबांसारखी तीच शैली दुसरे बाळासाहेबच पण तरी आज पक्षातून बाहेर पडून स्वतःच महत्व कमी केलं अन पक्ष 13 आमदारांवरुन एका आमदारावर आला.महानगर पालिकाही हातून गेल्या कारण जनतेसमोर पर्याय उभा करू शकले नाही. जनतेची मन जिंकू शकले नाहीत. हिंदूत्व कधी अंगी आणलच नाही. तेच उद्धवसाहेब करु पहात आहेत.पुरोगामी लोकांचे विचार अंगीकारत आहेत.संभाजी बिग्रेड डाव्याविचारांच्या लोकांशी जुळवून घेत आहेत जे बाळास्हेबांनी कधीच जुळवून घेतलं नाही.हिंदूत्व विसरणार्यांची स्थिती अशीच होते.पवारांचे बोट धरून चालणार्यांना अशीच किंमत मोजावी लागत आहे.

Edited by : Virendra Sonawane

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments