Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

April Fools' Day: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

April Fools' Day: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास
, बुधवार, 31 मार्च 2021 (13:39 IST)
जगात प्रत्येक दिवशी कोणता न कोणता सण साजरा केला जातो. प्रत्येक दिनाचं आपलं महत्त्व असतं आणि लोक आनंद घेत तो दिवस साजरा करतात. अशात 1 एप्रिल रोजी मूर्ख दिवस साजरा का केला जातो? या दिवशी लोक एकमेकांची थट्टा का करतात हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
 
फूल डे 1 एप्रिल रोजी का साजरा केला जातो
यामागील ठोस कारण माहित नाही तरी वेगवेगळ्या कहाण्या मात्र आहे. बरेच इतिहासकारांप्रमाणे याचा इतिहास सुमारे 438 वर्ष जुना आहे. जेव्हा 1582 मध्ये फ्रान्सने ज्युलियन कॅलेंडर वगळता ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. जूलियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं तर ग्रेगोरियन दिनदर्शिकेत ते एक जानेवारीपासून सुरु होतं. 
 
त्याच वेळी असे म्हणतात की दिनदर्शिका बदलल्यानंतरही बर्‍याच लोकांना हा बदल समजण्यात न आल्यामुळे ते 1 एप्रिललाच नवीन वर्ष साजरा करीत होते. मार्चच्या शेवटल्या आठवड्यापासून त्यांचं सेलिब्रेशन सुरु होऊन ते 1 एप्रिलपर्यंत चालत असे. अशा परिस्थितीत हे सर्व लोक विनोदांचे कारण बनले, ज्यामुळे त्यांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले आणि हा दिवस सुरू झाला.
 
या व्यतिरिक्त काही इतिहासकारांनी फूल डे साजरा करण्यामागील हिलेरियाशी संबंध जोडले. हिलारिया हा लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ आनंद असा आहे. तसंच प्राचीन रोममध्ये हिलारिया हा समुदाय उत्सव म्हणून साजरा केला जात होता. हा सण मार्चच्या शेवटी साजरा केला जात असे. यात लोक वेश बदलून एकमेकांना मूर्ख बनवत होते. येथून एप्रिल फूल दिवस साजरा करण्याची परंपरा सुरु झाल्याचे देखील म्हटलं जातं.
 
एवढेच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी इटली, बेल्जियम आणि फ्रान्समधील लोक एममेकांच्या पाठीवर कागदाने तयार केलेले मासे चिटकवून देतात, ज्यामुळे याला एप्रिल फिश असेही म्हणतात. 
 
या दिवशी कुठलीही अधिकृत सुट्टी नसते परंतू लोक अपाल्या मित्र-नातेवाईकांना मूर्खात काढून हा दिवस साजरा करतात. परंपरेनुसार काही देश जसं न्यूझीलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका येथे या प्रकारी थट्टा केवळ दुपारपर्यंत केली जाते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Haridwar Kumbh 2021: हरिद्वार कुंभात जाणार्‍यांनीलक्ष द्या! उत्तराखंडामधील 12 राज्यांमधून येणार्‍या लोकांसाठी RT-PCR चाचणी रिपोर्ट अनिवार्य