Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीच तोडू नये

जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीच तोडू नये
, मंगळवार, 30 मार्च 2021 (09:08 IST)
माणुस कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून...आजवर खूप 
माणसं कमावली...हीच आमची श्रीमंती...!!
 
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ...
आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ... 
 
ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मूळ आहे.
 
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे.
 
"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे". 
 
"वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली
 पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या मित्रांची सोबत 
वाढवा".
 
आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका. 
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. 
 
जीवनामध्ये या 5 गोष्टी 
कधीच तोडू नका.
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम 
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही. परंतु वेदना खुप होतात.
 
-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटील