Dharma Sangrah

गुजराती भाषेच्या आक्रमणामुळे आज मराठी भाषा संकटात

Webdunia
श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कर्मभूमीत आज मराठी माणूस मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी अक्षरशः तडफडतो आहे. मागील चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकार गुजरातमधील मराठी माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्यांकडे ढुंकूनही न पाहिल्याने येथील मराठी भाषा संकटात सापडली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे नाराज असलेली मराठी माणसे आज मराठी भाषेकडे पाठ फिरवली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठी संस्कृतीपासून दूर होत जाणारी ही चौथी पिढी आहे. गुर्जर भाषेच्या आक्रमाणामुळे मराठी भाषा संकट सापडल्याची दिसून येते. बडोदेला सयाजीनगरी या नावाने ओळखले जाते ही गोष्ट मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. महाराजा सयाजीरावांनी बडोदे संस्थानमध्ये मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यात जे योगदान दिले त्यास तोड नाही. 16 व 17 व्या शतकात मोघलांना येथून हुसकावून लावले. 1721 मध्ये बडोदा संस्थानची स्थापना करण्यात आली. ती नंतर इंग्रज राजवटीतही स्वायत्त संस्था म्हणून टिकून होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. आज खनिज तेलाच्या व्यवसायाने समृध्द झालेल्या बडोदेनगरीत मराठी माणूस स्थिरावला असला तरी तो मराठी संस्कृतीपासून परांगदा होत असल्याचे दिसून येते.
 
या संदर्भात बोलताना गुजरातमधील मराठी भाषक व चैतन्य मराठी संस्थासाठी समाजकार्य करीत असलेले तसेच राजभाषा सचिव असलेले राजेंद्र लुकतुके यांची भेट घेतले असता ते म्हणाले, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर पत्नीच्या नावाने बडोदे शहरात महाराणी चिमणाबाई माध्यमिक शाळा आहे. तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त आठ मराठी संस्था आहेत. येथे थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवले जातात. मराठी कार्यक्रम होतात. परंतु आज मराठी मुले हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषा शिकत आहेत.
 
बडोदे शहराची लोकसंख्या 20 लाख असून त्यात चार लाख मराठी भाषक आहेत. आजच्या पिढीली शुध्द मराठी बोलता येत नाही. यानंतरचा काळ मराठी भाषेसाठी अनुकूल असणार नाही असेच चित्र आहे. बडोदे शहरातील दांडिया बाजारात बहुसंख्य मराठी भाषक राहतात. येथील मराठी माणूस आनंदी असला तरी तो आज सांस्कृतिकदृष्ट्या पराधीन होत चालला आहे. या शहराने मराठीची ओळख कायम ठेवली असली तरी येथील मराठी माणसाची मराठी नाळतुटत आहे. आगामी काळात येथील मराठी माणसांसाठी महाराष्ट्र सरकारने ठोस उपाय योजले नाही तर मराठी माणूस गुजराती झाल्याशिवाय राहणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: नितेश राणेंविरुद्ध न्यायालयाने मोठी कारवाई केली

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यावर न्यायालयाने मोठी कारवाई केली, अजामीनपात्र वॉरंट जारी

Municipal Elections उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

कार्यकर्ते नाहीत, ते निवडणूक कशी लढवतील? बावनकुळे यांचा ठाकरे बंधूना टोमणे

Vijay Hazare Trophy वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ!

पुढील लेख
Show comments