Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tilak death anniversary गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त..

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (06:32 IST)
Bal Gangadhar Tilak death anniversary टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले. 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.
 
महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली.
 
टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.
 
टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी वसपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. 1876-77 साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने ‘कर्ज काढून सारा भरू नका’ या वाक्याने ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले. काद्याच्या चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात 1897 मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना 18 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
 
1907 मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये न करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांनी बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना 6 वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला.
 
मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली.
 
‘दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’
 
सुधाकर कुळकर्णी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

पुढील लेख
Show comments