Festival Posters

संगीत व नवी भाषा शिकल्याने जास्त प्रभावी होतो मेंदू

Webdunia
एखादी नवी भाषा बोलण्यास शिकणे आणि वाद्य वाजविण्याचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे आपला मेंदू जास्त प्रभावीपणे काम  करण्यास सक्षम होऊ शकतो, असे एका ताज्या अध्ययनात आढळून आले आहे. म्हणूनच संगीतकार आणि दुभाषी लोकांमध्ये काम करण्याची आठवण अधिक चांगली असते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. न्यूयॉर्क केडी ऑफ सायन्सेसमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार, संगीत वा एकापेक्षा जास्त भाषांची जाण असलेले लोक मेंदूच्या विविध नेटवर्कमध्ये सक्रिय असतात आणि त्यांच्या मेंदूच्या हालचाली कमी असतात. कॅनडातील बेक्रेस्टस रॉटमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ क्लाउडे लन यांनी सांगितले की, समान काम करण्यासाठी संगीतकार आणि दुभाषी लोकांना कमी प्रयत्न करावे लागतात, असे या अध्ययनात दिसून आले. ते ज्ञानासंबंधीच्या घसरणीतही त्यांचा बचाव करते आणि स्मृतीभ्रंशाचा धोकाही टाळते. एखादे वाद्य वा नवीन भाषा शिकणार्‍या व्यक्तीचा अनुभव त्याचा मेंदू कशाप्रकारे काम करतो आणि मेंदूच्या कोणत्या नेटवर्कचा वापर करतो, हे ठरवू शकते, असे या अध्ययनाच्या निष्कर्षांमध्ये आढळून आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

धक्कादायक: लातूरमध्ये लोन रिकव्हरी एजंटला जिवंत जाळले

IND vs SA: भारतीय संघाने तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला

LIVE: नाशिकमध्ये कलामंदिर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आणि विकासकामांचे भूमिपूजन

हाँगकाँगला अंतिम सामन्यात हरवून भारत स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला

मेस्सी आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पोहोचेल; कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

पुढील लेख
Show comments