सिगारेट ओढल्यामुळे आरोग्याबरोबरच जमीन आणि पर्यावरणावरही परिणाम होत असतो. सिगारेट हे प्लास्टिपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
अंगलिया रस्किन युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार सिगारेट पिऊन फेकून देण्यात येणारे फिल्टर हे जमिनीबरोबरच पर्यावरणालाही हानी पोहोचवते. सिगारेटमधील फिल्टर हे ‘सेल्यूलोज एसिटेट फायबर’ पासून तयार केले जाते. जे एक प्रकारचे ‘बायोप्लास्टिक’च असते. हे कुजण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठा काळ जमिनीत राहिल्याने जमिनीची उपजाऊ क्षमता कमी होत जाते. यामुळ बियाणे अंकुरित होत नाहीत. जर झालेच तर त्या अंकुरांचा विकास होत नाही. एका अंदाजानुसार जगभरात एका वर्षात 4.5 लाख कोटी सिगारेट पिल्यानंतर त्यांचे फिल्टर फेकून दिले जातात. या फिल्टरांच्या संपर्कात आल्यास झाडाची उंची 28 टक्के घटते. यामुळे प्लास्टिकपेक्षाही सिगारेट धोकादायक असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.