Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निबंध : माणसाचा खरा दागिना निरोगी बळकट शरीर

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (23:05 IST)
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपण सर्वांना या धावपळीच्या जीवनातून किमान स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. योग्य आहार, पुरेशी झोप, फळांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे. शरीर चांगले सुदृढ असेल तर आपण काहीही करू शकतो. प्राचीन काळापासूनच सुदृढ आणि निरोगी शरीराचे महत्व आहे. प्राचीन काळात माणूस निसर्गसच्या सानिध्यात राहत आहे. परंतु हळू - हळू काळ लोटला आणि नवीन नवीन यंत्राचा शोध लागला आणि माणूस त्याच्या आहारी गेला. आज तरुणांना देखील कमी वयात मोठेमोठे आजार होत आहेत. शरीर निरोगी असेल तर माणसाचा ज्ञानाचा आणि विद्ववतेचा उपयोग आहे. 

शरीर हे माणसाची खरी मोठी संपत्ती आहे. धन किंवा संपत्ती गेल्यावर पुन्हा मिळविता येते परंतु शरीररूपी संपत्ती ढासळली तर परत मिळविणे कठीण आहे. शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीराची स्वच्छता राखणे हे खूप आवश्यक आहे. काही चांगल्या गोष्टीची  सवय लावायला पाहिजे. जेवण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यावर हात,पाय तोंड धुणे, दररोज दात घासणे, आंघोळ करणे. नखे कापणे, केस विंचरणे अशा चांगल्या सवयींना अवलंबविल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहील.असं म्हणतात की "आरोग्यम धन संपदा "  तर या शरीराच्या आरोग्य रुपी संपदेची जोपासना करणे आपले मुख्य कर्तव्य आहे. 
 
या साठी काही सवयी अवलंबवा आणि त्यांना अंगीसार करा -
 
* दररोज नियमानं व्यायाम करा.
* जेवणापूर्वी हात धुवावे.
* वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ऋतूला साजेशी आहार घ्या.
* पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड पदार्थ खाऊ नये.
* पावसाळ्यात तेलकट तुपकट खाऊ नये.
* पूर्ण आणि पुरेशी झोप घ्या. 
* दररोज एक फळ खा.
* पौष्टीक आहार घ्या.
* भाज्या स्वच्छ धुवून घ्या.
* शरीराची स्वच्छता राखा.  
आपण हे सर्व सवयी अवलंबवा तरच आपले आरोग्य सुदृढ  राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

Beauty Tips :चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी उत्कृष्ट चारकोल फेस मास्क बनवा

बीपी आणि मधुमेह नियंत्रणासाठी या छोट्या आंबट फळाचा आहारात समावेश करा

नातेसंबंधातील अहंकाराची सकारात्मक बाजू काय आहे जाणून घ्या

हितोपदेशातील मनोरंजक कथा : निर्दोष गाढव

राजघराण्यातील मुलींची नावे मराठी Royal Marathi Girl Names

पुढील लेख
Show comments