Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘गेट टुगेदर’चे आयोजन कसं कराल?

वेबदुनिया
३१ डिसेंबरला काय काय करायचं, याचं प्लॅनिंग एव्हाना सुरू झालं असेल. गतवर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी रात्री जागून पाटर्य़ा करणं हे आधुनिक आणि परदेशी खूळ आहे, असं मानण्याचं काहीच कारण नाही. उलट त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येऊन काही काळ मस्त मजेत घालवू शकतो. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणार्‍या या दिवसाचे प्लॅनिंगही तसेच फक्कड असायला हवे नाही का? त्यातून यंदा ३१ डिसेंबर शनिवारी आला आहे. त्यामुळे एक विकएन्ड सगळ्यांनाच मिळाला आहे.

बाहेरगावी जाऊन नववर्षाचं स्वागत करण्याचा पर्याय आहेच; पण बाहेर जायचं नसेल आणि हॉटेलच्या प्रचंड गदारोळातही जाण्याची इच्छा नसेल, तर घरीच तुम्ही ३१ डिसेंबरची मस्त पार्टी आयोजित करू शकता. तुमचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलवून गप्पांचे फड रंगवू शकता. खाण्याची मौज लुटू शकता. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने एक ‘गेट टुगेदर’ आयोजित करू शकता.

आमंत्रण
३१ डिसेंबरच्या पार्टीला कुणा-कुणाला बोलवायचं आहे त्याची यादी तयार करा.
तुम्ही काही थीम पार्टी करत असाल, तर त्याबद्दलही आमंत्रणात लिहा. (म्हणजे, सगळ्यांनी एका विशिष्ट प्रकारचे कपडे घालून येणं अपेक्षित असेल किंवा रंग अपेक्षित असेल तर त्याबद्दलही लिहा.)

एखादी थीम ठेवा?
एरवी आपण सगळे एकत्र जमतो तेव्हा थीमबिमची काही भानगड नसते; पण यावेळी ३१ची पार्टी आयोजित करताना त्यात जरा वेगळेपणा असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही एखादी थीम ठरवू शकता. म्हणजे सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषेत यायचं किंवा तुम्ही एखादा रंग ठरवू शकता.

मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आवडीने मेन्यू ठरवा?
मेन्यूचा विचार करताना किचकट मेन्यू शक्यतो ठेवू नये. नातेवाईक आणि मित्रमंडळी सहकुटुंब येणार असल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आवडीनिवडी लक्षात घ्या.

इको-फ्रेण्डली
पार्टीचे आयोजन करताना शक्यतो, पर्यावरणपूरक पार्टीचे आयोजन तुम्ही करू शकता. इको-फ्रेण्डली राहण्यासारखं सोपं आणि स्वस्त काहीही नाही. एरवी आपण काय करतो, तर कुठलाही कार्यक्रम असला की पेपरप्लेटस्, थर्माकॉलचे ग्लास घेऊन येतो. प्लॅस्टिकचा विपुल वापर करतो. पण यंदाच्या या गेट टुगेदरला प्लॅस्टिक, कागद आणि थर्माकोल न वापरण्याचा निश्‍चय तुम्ही करू शकता. स्टील आणि काचेच्या ताटल्या, ग्लास, बश्या यांचा वापर सहज शक्य आहे.

मुलांसाठी स्पेशल खेळ
अनेकदा मुलांना मोठय़ांच्या पार्टीमध्ये कंटाळा येतो. एकतर मोठय़ांचे विषय वेगळे असतात आणि त्यांच्या पार्टीमध्ये दंगामस्ती करता येत नाही. म्हणूनच शक्य असेल, तर तुम्ही मुलांसाठी एक निराळी खोली सजवा. तिथे मुलांना आवडतील असे खेळ ठेवा. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवा. मुलांची संख्या बरीच असेल, तर मुलं त्यांची पार्टी त्या खोलीत मस्त करू शकतील. तुमचं लक्षही राहील आणि मुलांना कंटाळाही येणार नाही.

गोडमध्ये काय!
पाहुण्याची संख्या फारशी नसेल तर मग तुम्ही केक, सुफले, पुडिंग, फिरणी, गुलाबजाम अशा विविध पर्यायांचा विचार करू शकता. मुलांसाठी केक किंवा पेस्ट्रीज असतील तर मुलं जाम खूश होतील हे नक्की !

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

पुढील लेख
Show comments