Marathi Biodata Maker

होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे...

Webdunia
शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (18:16 IST)
....असच एक दिवस एका मोठ्या प्रदर्शनात गेलो, फिर फिर फिरलो, खूप काही होतं तिथं, खेळणी, बांगड्या नानाविध कलाकुसरी च्या वस्तू, वगैरे.जे इतर ठिकाणी प्रदर्शनात असतं ते सगळं होतं तिथं, खाण्याचे जिन्नस ही होते, पॉपकॉर्न , बुढिचा बाल, दाणे, चनाचोर व इतरही.
 
आम्ही हौशेने बुढीचे बाल विकत घेतला. तो हातात आल्यावर त्याचा एक लचका तोडला तोंडात विरघळत असतानाचं लहानपणीचे दिवस आठवले.
 
काचेच्या बंद पेटीतून एक माणूस विकायला यायचा. तेव्हा दहा पैशात खूप काही मिळायचं. तेव्हा अजून एक गंमत म्हणजे एका मोठ्या दांडूला खूप रंग बेरिंगी साखरेचा गुळाचा पाक असलेला प्लास्टिकच्या पुडक्याने झाकलेले असायचं. त्या माणसाला आपण आकार सांगायचं तो सायकल, स्कूटर, फॅन आणि इतर ही आकार त्यातून बनवून द्यायचा.
 
कोण गंमत यायची आणि तो कलाकार पोटा साठी हसत हसत हुबेहूब ते तयार करून घ्यायचा. ती जादू अलगच दुनियेत घेऊन जायची आम्हाला. त्याच्या भोवती घातलेला गराडा आणि आजूबाजूला आम्ही चिल्ल पिल्लं.
 
तसंच आईस फ्रूट वाला पण यायचा, 5 पैसे, 10 पैसे खूप झाले, मस्त टेस्टी असायचं, जीभ लालचुटुक व्हायची, कुणाची नारंगी एकमेकांना जीभ दाखवायचो.
आज ice-कँडी मिळते, आमच्या वेळे सारखं ते लागतही नाही आणि ती चवपण नसते.
 
सहज विचार येतो की खरंच हे अगदी छोटा व्यवसाय करणारे, बिचारे ज्याचं दुकान म्हणजे त्यांची सायकल आणि ते घेऊन दारोदार भटकत फिरतात बिचारे. अस कितीसा कमावतं असणार? रोजचा त्यांच्या परिवार चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो तरी निघतो की नाही ह्यातून?
 
कार्यालयाबाहेर सायकल वर फुगे घेऊन असतात, किती फुगे विकले जात असतील त्यांचे, कोण घेत असेल ? असे नानाविध प्रश्न मला पडतात.
 
पण अशा ह्या लोकांना पाहिलं की वाटतं की हे लोकं हिंमत न हरता, भांडवल नसताना, जागा नसताना आपलं व आपल्या परिवाराचं पोट भरू शकतात तर मग आपण किंवा आपल्या मुलांनी हिंमत न हरता आशा कठीण काळातही हिंमत ठेवून काम शोधायला हवं, धंदा उभा करायला हवा! तेव्हाच तर सगळं सुरळीत होईल न !
म्हणतात न की, "हिम्मते मर्दा तो मदद दे खुदा"! उठा उठा हरून बसू नका ...होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे. 
........अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उद्धव सरकार फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचा कट रचत होते! माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या अहवालात खुलासा

मतदानाची अधिकृत वेळ जाहीर; सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत नागरिकांना मतदान करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

बदलापूर घटनेतील आरोपींचा शिरच्छेद झाला पाहिजे, कालीचरण महाराजांचे विधान

LIVE: मतदानाची अधिकृत वेळ जाहीर

पुढील लेख
Show comments