Festival Posters

नको बोलघेवडेपणा

Webdunia
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)
अनेक लोकांना ऑफिसमध्ये तेथील मुख्य काम करण्याऐवजी इतरांबद्दल वाईट गोष्टी पसरवण्याची सवय असते. हा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना नडतो आणि ते यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशी सवय असणार्याप लोकांपासून दूर राहणे चांगले.
 
सुजय ऑफिसमध्ये कामासाठी जातो. पण, तो तेथे प्रत्यक्ष काम करण्याऐवजी इकडच्या गोष्टी तिकडे पसरवणे आणि त्याला मीठ-मसाला लावून त्या इतरांना सांगणे एवढे एकच काम तो करतो. ऑफिसमध्ये इतर लोक काम करत असतील त्यावेळी तो आपल्या बॉसकडे जातो आणि आपल्या सहकार्यांच्या विरोधात त्याचे कान भरण्याचे काम करतो. तो तेथे जाऊन म्हणतो, ‘सर, काल अमित काहीसा हैराण असल्यासारखा दिसत होता.' त्यावर त्याच्या बॉसने कारण विचारल्यावर तो सांगतो की मीदेखील त्याला तसं विचारलं त्यावेळी त्याला अमुक एक समस्या असल्याचं लक्षात आलं, असं उत्तर तो देतो. त्यापुढे जाऊन तो म्हणतो, ‘सर, त्याच्याबाबतीत बर्या्च समस्या आहेत. त्यामुळेच तोप्रत्येकाशी उलट-सुलट बोलत असतो. आता कालचंच सांगायचं तर काल त्याने तुमच्या विरोधात अमुक एक गोष्ट इतरांना सांगितली. मी खोटं बोलत असेन तर मला नोकरीतून काढून टाका. मी त्यावेळी गप्प बसलो नाही त्यावेळी तो गप्प बसला.'
 
ही गोष्ट अमितला कळली त्यावेळी त्याने सुजयला त्याचं कारण विचारलं. त्यावेळी सुजयने आपला पवित्रा बदलला. ‘अरे, मी तुझ्याविषयी असं कसं बोलू शकेन' असं तो म्हणाला. असं बोलल्यानंतर आपला विचित्र परिस्थितीतून बचाव झाला असं सुजयला वाटतं. पण, अशा स्थितीचा त्याला वारंवार सामना करावा लागणार आहे. याचं कारण त्याची ही सवय इतक्या सहजपणे सुटणारी नाही. त्यामुळे तो वारंवार तसंच करत राहणार आणि एखाद्या दिवशी सर्व लोक त्याला घेरतील तेव्हा तो स्वतःचा बचाव करु शकणार नाही. या धोकादायक सवयीला आपण बोलघेवडेपणा म्हणतो.
 
अशा प्रकारे अनेक लोकांना मुख्य काम करण्याऐवजी अशी कामं करण्यातच मौज येते. असे लोक फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण, त्यांचा खोटारडेपणा कधी ना कधी उघडकीला येतोच. अशा सवयी हादेखील एक प्रकारचा आजार आहे आणि तो संसर्गजन्य असतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं. आपल्या ऑफिसमध्येही अशी सवय असणारे लोक असतील तर त्यांच्यापासून दूर राहा. एखाद्याने दुसर्यााविषयी काही वाईट गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्या जागेवरुन त्वरित दूर जावं किंवा त्या माणसाला थांबवावं.
 
 विधिषा देशपांडे 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

Bank Holiday January 2026: या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होतील

जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला

पुढील लेख
Show comments