Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत तुकाराम महाराज-छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक भेट

Chhatrapati Shivaji Maharaj
, बुधवार, 19 मे 2021 (14:32 IST)
संत तुकाराम यांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांच्या हाती संत तुकाराम यांच्यासाठी मशाल, छत्र, घोडे आणि रत्ने पाठवले. संत तुकारामांना बघून सेवक म्हणाले- आपण परमेश्वाराचे परम भक्त आहात म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सेवक, घोडे आणि पालकी पाठवली आहे. आपण आमच्यासोबत राजदरबारात यावे.
 
यावर संत तुकारामांनी विनंतीपूर्वक म्हटले की आपल्या महाराजांना सांगावे की आपल्यावर सदा कृपा राहील परंतू मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करु नका. मी जिथे आहे, ज्या अवस्थेत आहे, खुश आहे. माझी कुटियाच माझं राजमहाल आहे. आणि माझ्या विठ्ठलाचं मंदिरच माझं राज दरबार आहे.
 
संत तुकारामांचे हे निर्लोभ रुप बघून राजा देखील हैराण झाले. ते स्वतं अलंकार, वस्त्र, धन-दागिने घेऊन सेवकांसह तुकारामांना भेट द्यायला देहू गावी आले. हे सर्व वैभव बघून तुकाराम म्हणाले- 
 
‘दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥
मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥
गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥
सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती॥
तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥’
 
मुंगी आणि राव, सोने आणि मृत्तिका समान असून आम्हाला तुम्ही प्रभुचिंतन करण्याचे खरे सुख आहे ही भूमिका त्यांनी मांडली. बहुमोल रत्नांचा नजराणा आमच्यासाठी कामाचा नव्हे. यात आमचं संतोष होणार नाही केवळ प्रभू भक्ती हेच श्रेष्ठ आहे.
 
आता पंढरिराया। येथे मज गोविसी कासया॥
आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥
तुमचे येर ते धन। ते मज मृत्तिकेसमान॥
 
संत तुकारामांच्या उपदेशाला प्रभावित होऊन शिवाजी महाराज भजन, कीर्तन श्रवण करु लागले तेव्हा संत तुकारामांनी त्यांना क्षात्रधर्म सांगितले-
 
पाईकीचे सुख पाईकासी ठावे। म्हणोनिया जीवे केली साटी॥
येता गोळया बाण साहिले भडिमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण। मग त्या मंडण शोभा दावी॥
पाईकांनी सुख भोगिले अपार। शूर आणि धीर अंतर्बाही॥
पाईक तो जाण पाइकाचा भाव। लगबग ठाव चोरवाट॥
आपण राखोनी ठकावे आणिक। घ्यावे सकळीक हिरोनिया॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक। बळिया तो नाईक त्रैलोकीचा॥
 
जे शूर पुढे होऊन गोळया आणि बाणांच्या वर्षावाला छाती पुढे करतात, असे शिपाई एखाद्या राज्याचा नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी-बळिया म्हणून शोभेल. अर्थात असे शिपाई शिवरायाचे होते तसंच असावे ही आकांक्षा या साधुश्रेष्ठाची होती.
 
संत तुकाराम यांना वंदन करुन शिवाजी महाराजांनी निरोप घेतला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यांचे काय म्हणणे ऐका?