suvichar

‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’... इसाक बागवान यांची शौर्यगाथा इंग्रजीत

Webdunia
मंगळवार, 3 जुलै 2018 (11:21 IST)
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार प्रकाशन
 
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ॲड. उज्ज्वल निकम राहणार उपस्थित 
 
मध्य मुंबई आणि पोलीसांवर दहशत माजवणारा खतरनाक गुंड मन्या सुर्वेचा कर्दनकाळ ठरलेले, १९८० च्या दशकातील बडा राजन, हाजी मस्तान, पठाण गँग, दाऊद गँग, पोत्या - अमर नाईक - अरूण गवळी टोळी, ड्रग्ज किंग आगा खानसारख्या आणि इतर समाजविघातक शक्तींना वेसण घालणारे जिगरबाज पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या शौर्यगाथेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गुरूवारी ५ जूलै रोजी मुंबईच्या रंगशारदा नाट्यगृहात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, खा. संजय राऊत, पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद, अभिनेता रझा मुराद, निवृत्त पोलीस सहआयुक्त मधुकर झेंडे आदी मान्यवर ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
११ जून १९८२ रोजी पोलीस इतिहासातील (मन्या सुर्वेच्या) पहिल्या एन्काऊंटरमुळे नावारूपास आलेले ते 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात एन.एस.जी कमांडो येईपर्यंत नरीमन हाऊसचा किल्ला यशस्वीरित्या लढविणारे निवृत्त सहआयुक्त इसाक बागवान.  ३५ वर्षांच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक रोमांचकारी गुन्ह्यांचा लावलेला छडा, अनेक अप्रकाशित घटना आणि रहस्यमय किस्से ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. त्याकाळी आतासारखी संपर्क साधने नसतानाही केवळ खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे थेट गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर छापे मारून रक्ताला चटावलेल्या अनेक खतरनाक गुंडांच्या मुसक्या आवळण्यात इसाक बागवान यांचा हातखंडा होता.
 
तीन वेळा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळविणारे इसाक बागवान हे स्वत: अनेकवेळा गुन्हेगारी टोळ्यांच्या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. पोलीस उपनिरिक्षक ते सहायक आयुक्त ह्या प्रवासात केवळ धाडसी पोलीस अधिकारी म्हणून नाही तर खाकी वर्दितील सहृदयी माणूस अनेक घटनांमधून पोलीस दलाने आणि समाजाने अनुभवला आहे. अशा ह्या कर्तबगार इसाक बागवान यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीय नागरीकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

होळीच्या दिवशी १,२४४ विशेष गाड्या चालवल्या जातील, रेल्वे मंत्रालयाची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तहसीलमधील कालव्यात झालेल्या कार अपघातात तीन जणांचे मृतदेह सापडले

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तेल कंपन्यांना डिझेल निविदेत हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला

एसटीची शिवशाही बस बंद होणार; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments