Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक कुटुंब दिन : कुटुंबात हवी सहनशीलता!

Webdunia
रविवार, 15 मे 2022 (10:46 IST)
भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंबपद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंपद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. खर तर एकत्र कुटुंबपद्धती इतर दुय्यम नातेसंबंधाचा अंतर्भाव होतो.
 
एकिक कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकर्यात करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. खर तर कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात.

कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबात प्रेम नसेल, ते कुटुंब, कुटुंब नसून स्मशान आहे. असे समजावे. आपल्याला माहित आहे. स्मशानात अनेक प्रेत असतात, परंतु एकमेकांना कदी भेटन नसतात किंवा बोलत नसतात. ज्या कुटुंबात सासू-सून, पती-पत्नी आणि पिता-पुत्र एकत्र राहत असूनही एकमेकांना बघून आनंदीत होत नसतील, तर ते कुटुंब स्मशान नाही काय? आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. 'हेल्पेज इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 52 टक्के वृद्ध अशिक्षित आहेत. 50 टक्के वृद्ध आर्थिक दृष्ट्या आपल्या मुलांवर व सुनांवर अवलंबून आहेत.

85 टक्के वृद्ध वैद्यकीय उपचारावरील खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. 98 टक्के वृद्ध हे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत नाहीत. याबाबत तक्रार करणे मग लांबच राहते. अपमान सहन करणे हा या वृद्धांच्या दिन चर्येचाच भाग बनला आहे. 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून आपण संपूर्ण जगात साजरा करतो. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही. 15 मे जागतिक कुटुंब दिनी भारतातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि सुख समृद्धीने नांदावे तसेच एकत्र कुटुंबपद्ध सर्वत्र रूजावी व एकत्रर कुटुंबपद्धतीत वाढ व्हावी, एवढीच या 'जागतिक कुटुंब दिनी' अपेक्षा!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

पुढील लेख
Show comments