suvichar

गुरू ग्रहाच्या वलयांचे रहस्य उलगडले

Webdunia
गुरूवार, 15 मार्च 2018 (15:21 IST)
सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूवर वाहणार्‍या वेगवान वार्‍यांबाबत शास्त्रज्ञांना नवी माहिती मिळाली आहे. गुरूवर ढगांच्या 1800 मैलखोलवर जबरदस्त चक्रिवादळे वाहत असतात, असे एका ताज्या संशोधनातून शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गुरूवर दिसणार्‍या पट्टेदार वलयांचे कारणही त्यातच दडलेले आहे. या ग्रहावर घोंगावत असलेल्या हायड्रोजन आणि हेलियम वायूच्या विशाल गोळ्यांमुळे या ग्रहावरील हवेमध्ये परिवर्तन होते आणि तेच या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये होणार्‍या बदलांचेही कारण असते. त्यामुळेच ग्रहाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमध्ये असंतुलनाची स्थितीही तयार होत असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, गुरूच्या सर्व ध्रुवावर अनेक मैल रुंद चक्रीवादळे घोंगावतात. ही चक्रीवादळे बहुभुजी वादळांनीही घेरलेली असतात, असेही या अध्ययनात दिसून आले. उत्तरेला त्यांची संख्या आठ आहे, तर दक्षिणेला पाच आहे. नासाच्या विशेषज्ञांनी या तथ्यांचे आकलन केले. त्यांनी सांगितले की, गुरूच्या पृष्ठभागावर हवा उलट दिशेने वाहते. यादरम्यान तिचा वेग प्रतिसेकंद शंभर मीटर असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

बांगलादेशात गोवरचा कहर, आतापर्यंत ५२८ मुलांचा बळी

LIVE: राज्यात पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी

नीट पेपरफुटी प्रकरण: पुण्यातील प्राचार्यां मनीषा हवालदार यांनी पैशांसाठी प्रश्न वाट्ल्याचा सीबीआयचा खुलासा

१० दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ! पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या, सामान्यांच्या खिशाला मोठा कात्री

पुढील लेख
Show comments