Festival Posters

कल्की अवतार आणि मोदी

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (13:49 IST)
पुण्य कमी झाल आणि पाप वाढायला लागलं कि विष्णू अवतार घेतो. पाप वाढल्यामुळेच विष्णू आपला अकरावा अवतार घेणार आहेत अन तो कुणाच्याना कुणाच्या रुपाने विष्णुंचा हा अकरावा अवतार असेल.
 
फेसबुकवर मोदी भक्त अन भाजपचे प्रवक्ते अवद्धुत वाघ यांनी पोस्ट केली कि मोदी विष्णुंचा अकरावा अवतार आहेत. यात त्यांनी त्याची भावना मांडली असेल. मत मांडण्याचा अधिकार प्रत्यकाचा आहे अन प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतील. त्याविषयी सविस्तर लिहीण मला महत्वाच वाटलं म्हणून त्याविषयीची काही मत मांडत आहे.
 
काही दिवसांपूर्वीच अटलजींच निधन झाल अन हा महान कवि राजकारणी कित्येक भाजपाईंचा देवच ह्या जगातून निघून गेला. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अस्थिंची 4000 कलश करुऩ संपूर्ण भारतात दर्शनासाठी पाठवली होती अन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्या कलशाच्या दऱ्शन घेतलेले फोटो पोस्ट केले होते. त्यावेळेलाही बर्याच माध्यमांमधून त्यांच्यावर टिका झाली होती की एवढी कलश का म्हणून वगैरे वगैरे. असो मुद्दा हा नाहीच आहे मुळात पण सांगावा लागला काहीही झालं की भाजपावर टिका किंवा संघावर टिका करणे विरोधकांची सवयच आहे. महाराष्ट्रातील भाजपचा प्रवक्ता अस म्हणतोय मग संपुर्ण सोशल मिडीयावर तिच चर्चा कि मोदींना भाजपाने देवत्व देवुन टाकलं. पण कुणाचे व्ययक्तीक मत असू शकतात किंवा कुणातही देव शोधू शकतो अन त्याने एका योगी पुरुषात देव शोधला काय वाईट त्यात, का माणसाने माणसात देव शोधू नये.
 
मोदी तर ईश्वरीच अवतार आहे नाही तर येवढे मोठमोठे चमत्कार होणे शक्यच  नाही. भ्रष्टाचारी राक्षसांना संपवण्यासाठी मोदींचा जन्म, पाकला चोक उत्तर मोदीच देवू शकतात त्या साठी मोदींचा जन्म आहे, भारत मातेच्या सेवेतील हा सेवेकरी ईश्वरी अवतार पृथ्वीवर अवतरलाय आता तर राम राज्य राम मंदीर का नाही होणार अन ते नक्की होणार तेथे मोदीच पहीली आरती करणार. कुणीतरी कित्येक वर्षांपुर्वी भविष्यवाणी करुन गेलं होत, हिमालयात तपश्चर्या करणारी व्यक्ती ईश्वरी अवतार भारतात जन्म घेणार अन पंतप्रधान होणार, ही भविष्यवाणी खरी ठरलीय अन अवतारी पुरुष पंतप्रधान झालाय.
 
घोटाळा, भ्रष्टाचार, पाप, दलाली, काळा पैसा ह्या राक्षसांचा वध करण्यासाठीच मोदींचा जन्म झालाय. हा अवतार दुसरा तिसरा कुठलाच नाही तर कल्की अवतार आहे अन तो भगवंताने मोदींच्या रुपाने घेतलाय. हा अवतारी पुरुष 2019 लाही पंतप्रधान होणार यात काळी मात्र शंका नाही.
Virendra Sonawane

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नेदरलँड्सचे महापौर नागपूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आईचा शोध घेत आहे; ४१ वर्षांपूर्वी या घटनेने केले होते वेगळे

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, सागरी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेत ९ क्रू मेंबर्सना अटक

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

पुढील लेख
Show comments