Marathi Biodata Maker

तानाजी मालुसरे स्मृतिदिन: कोण होते नरवीर तानाजी मालसुरे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 (10:44 IST)
नरवीर तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता. जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजींच करु शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती.
 
एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळत्याक्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले. 
 
महाराजांनी सांगितले की आता कोंढणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जगहसाई होता कामा नये. तेव्हा तानाजींनी चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. "हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत.
 
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे 1500 हशमांची फौज होती. रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. 
 
रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. 
 
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना 4 फेब्रुवारी, 1670रोजी घडली.
 
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे.नरवीर तानाजी मालसुरे यांच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा 

Edited By- Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय खळबळ; पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा बचाव केला, आरोप निराधार असल्याचे म्हटले

LIVE: जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारले जाणार

मुंबई : मालाडमध्ये 'ऍसिड होळी'; कामगारांमधील संघर्षात अनेक जण जखमी

हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला

पुण्यात अवकाळी पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत तर खडकवासला येथे सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद

पुढील लेख
Show comments