*तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
*आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे.
*यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.
*कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.
*एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.
*राष्ट्रवाद हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे.
*आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही.
*आईचं प्रेम हे स्वार्थविरहीत आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही.
*श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते.
*जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.
*सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.
*चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.
*संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
*अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.
*व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.
*मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.
*फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.
*मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.