Dharma Sangrah

827 पॉर्न साईट्स ब्लॉक

Webdunia
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (09:19 IST)
केंद्र सरकारने 827 पॉर्न साईट्स ब्लॉक करण्याचे आदेश संबंधित इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्यांना दिले आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पॉर्नोग्राफीच्या 857 वेबसाईट ब्लॉक करण्याबाबत काय झाले, अशी विचारणा केली होती. मात्र, यापैकी 30 पोर्टल्सवर कुठल्याही स्वरूपाचा पोर्नोग्राफिक मजकूर नसल्याचे मंत्रालयाने केलेल्या पडताळणीत आढळून आले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पोर्नोग्राफिक मजकूर असलेल्या 827 वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश टेलिकॉम विभागाला दिले आहेत. 
 
दरम्यान, टेलिकॉम विभागाने इंटरनेट सेवेचे परवाने असलेल्या सर्व कंपन्यांना तातडीने 827 वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर 2018 रोजी यासंदर्भातील आदेश दिले होते. या आदेशांची प्रत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला 8 ऑक्टोबर रोजी प्राप्‍त झाली. त्यानंतर मंत्रालयाने टेलिकॉम विभागाला याबाबत आदेश दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अमरावती परतवाडा प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

LIVE: महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेप

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये १५ जूनपर्यंत हंगामी भाडेवाढ जाहीर

Tatya Tope Information क्रांतिकारी सेनापती तात्या टोपे

पुढील लेख