Dharma Sangrah

मूत्रापासून इंधन बनवणारी पावडर!

Webdunia
वॉशिंग्टन- निसर्गाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही असे म्टले जाते. एक नवे संशोधन हेच अधोरेखित करीत आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्यु‍मिनियम नॅनो पावडर बनवली आहे जी मूत्राचे रूपांतर तत्काळ हायड्रोजन मध्ये करू शकते. त्याचा वापर इंधनाच्या सेलला ऊर्जा देण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
विशेष म्हणजे याबाबतचे संशोधन करणार्‍या संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अमेरिकन सैन्याच्या रिसर्च लॅबोरेटरीमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी आधी जाहीर केले होते की त्यांचे नॅनो- गॅल्वेनिक अॅल्युमिनियम पावडर पाण्याच्या संपर्कात येताच शुद्ध हायड्रोजनचे उत्पादन करू शकते. आता त्यांनी पाण्याचे संमिश्रण असलेल्या कोणत्याही द्रव पदार्थाचाही असाच वापर केला. त्यामध्येही पावडर मिसळली तरी मोठ्या प्रमाणात हायड्रोजन निर्माण होतो.
 
सैनिकांना थेट लाभ मिळावा हा सैन्य दलाशी संबंधित संशोधकांचा हेतू असतो. आता कोणतेही प्रदूषण न करता वीज उत्पन्न करण्याचीही नवी पद्धत त्यांनी शोधली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

दिव्यांगांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ, फडणवीस मंत्रिमंडळाने १२ वर्षांपासूनच्या मागणीवर मोठा निर्णय घेतला

LSG vs DC: दिल्लीने लखनौवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली

LIVE: महाराष्ट्रात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत आले

"तुम्ही खूप सुंदर आहात, तुमची मुलगीही सुंदरच असेल तिला माझ्याकडे पाठवा, एएसआय निलंबित; अकोला मधील घटना

महाराष्ट्रात पडताळणीनंतर ६८ लाख लाडकी बहीण खाती बंद करण्यात आली; पात्र व्यक्तींना मिळालेली रक्कम काढली जाणार नाही

पुढील लेख
Show comments