विश्वकवी रवींद्र नाथ टागोर हे आपल्या भारतामधील उच्च दर्जाचे साहित्यकार आहेत. त्यांचे बहुमूल्य विचार आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. नोबल पारितोषिक प्राप्त विजेते आणि भारताच्या अश्या रत्नाला आमचा मानाचा मुजरा. टागोर यांचे काही बहुमूल्य विचार ...
1 तथ्य अनेक असले तरी सत्य एकच आहे.
2 जे आपले आहे ते आपल्याला मिळणारच.
3 खरं प्रेम स्वातंत्र्य देतं. अधिकार गाजवत नाही.
4 विनम्रतेत महान असणारे महानतेच्या सर्वात जवळ असतात.
5 नदीकाठी उभे राहून फक्त पाणी बघितल्याने आपण नदी पार करू शकत नाही.
6 मृत्यू प्रकाश दूर करणे नाही, तर केवळ दिवा विझवणे आहे कारण आता सकाळ झाली.
7 जी व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचे चांगले करण्यात व्यस्त असते, त्याच्याकडे स्वतः चांगलं होण्यासाठी वेळच उरत नाही.
8 प्रत्येक मूल जगात येताना संदेश देतं की देव अजूनही मनुष्याकडून निराश झालेला नाही.
9 एकट्या फुलाने काट्यांचा द्वेष करू नये. फूल तर एकच आहे पण काट्यांची संख्या जास्त आहे.
10 भांड्यात ठेवलेले पाणी चमकतं, समुद्राचे पाणी अस्पष्ट दिसतं. लघु सत्य स्पष्ट शब्दात मांडता येऊ शकतं परंतु महान सत्य नेहमी मौन राहतं.