Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वय 98 पण अजूनही विद्यार्थी

Webdunia
आपला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये 98 वर्षे वयाच्या पण मनाने तरुण असणार्‍या राज कुमार वैश्य यांनी आता अर्थशास्त्रातील एम.ए. ही पदवी मिळवली आहे. त्यांनी त्यासाठी नालंदा मुक्त विद्यापीठात परीक्षार्थी म्हणून नाव नोंदवले होते. त्यांचा हा शिक्षणातला उत्साह बघून त्यांच्या मानाने तरुण असलेल्या 70 आणि 80 वर्षांच्या वृद्धांनीही आश्चर्यांने तोंडात बोट घातली आहेत.
 
वैश्य हे 1980 साली एका मोठ्या कंपनीचे सरव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करायला सुरूवात केली होती. भारतातली गरिबी हटवायची असेल तर काय करावे लागेल यावर त्यांचे चिंतन सुरु झाले होते. त्यांना हा विचार करताना काही गोष्टींचा खुलासा होत नव्हता. तेव्हा आपण अर्थशास्त्रातली उच्च पदवी घेतली पाहिजे या निष्कर्षाप्रत ते आले. ते उत्तरप्रदेशातल्या बरेलीचे राहणारे आहेत आणि त्यांनी आपल्या तरुण वयात उत्तरप्रदेशातून बी.ए. ही पदवी मिळवली होती. त्यांचा विषय अर्थशास्त्र हाच होता. आता आपण याच विषयातली पदव्युत्तर पदवी मिळवायची असे त्यांनी ठरवले.
 
2015 साली त्यांनी नालंदा विद्यापीठात आपले नाव नोंदले आणि दोन वर्षात एम.ए. ही पदवी प्राप्त केली. 98 व्या वर्षी अशी पदवी मिळवणारे ते जगातले पहिलेच विद्यार्थी असावेत असे वाटते. यापूर्वी याच विद्यापीठातून 78 वर्षांच्या तरुणाने पदवी मिळवली होती.
 
98 वर्षांचे राजकुमार वैश्य हे नेहमी हसतमुख असतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना दोन मुले असून तीही आता सत्तरीपार गेली आहेत. एक मुलगा सेवेतून निवृत्त होऊन घरी बसला आहे. त्याची पत्नी म्हणजे राजकुमार वैश्य यांची सूनही 60 वर्षांची असून तीही मोठ्या सरकारी नोकरीनंतर निवृत्त होऊन घरात बसली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, प्रवेश वर्मा-कपिल मिश्रा यांच्यासह ६ आमदार मंत्री झाले

LIVE: रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

Alcohol भारतातील प्रत्येक पाचवा पुरूष मद्यपी, या राज्यात महिला मोठ्या प्रमाणात दारू पितात

राज्यातील अनेक भागात तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे, १५ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाची शक्यता, आयएमडीचा इशारा

SSC exams 2025: मुंबईत परीक्षेच्या दिवशी विशेष नियोजन, वाहतूक आणि वाहतूक हाय अलर्टवर

पुढील लेख
Show comments