Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वडिलांचे 5 प्रकार, जाणून चेहर्‍यावर येईल हसू

वडिलांचे 5 प्रकार, जाणून चेहर्‍यावर येईल हसू
फादर्स डे अर्थात वडिलांना समर्पित दिवस, त्याच्या त्या प्रत्येक कार्यासाठी ज्यामुळे आज आमच्या अस्तित्वाला महत्त्व आहे. फादर्स डे च्या दिवशी वडिलाच्या महत्त्वाबद्दल खूप काही बोललं जातं जे खरं आहे, पण आज आम्ही आपल्याला सांगत आहोत वडिलाच्या त्या प्रकारांबद्दल... त्यांच्या त्या विशेष गुणांबद्दल ज्यामुळे त्याची ओळख आहे-
 
1 उत्साह वाढवणारे वडील - या श्रेणीत ते सर्व वडील सामील आहेत, जे प्रत्येक कार्यात मुलांचा उत्साह वाढून त्यांना प्रोत्साहित करत असतात. आपण कुठे चुकला असाल किंवा आपण नाखुष असाल तरी ते आपल्या योग्य मार्गदर्शन देतात.
 
2 तक्रार करणारे वडील - जोश्यांच्या मुलाला  100 मार्क्स पडले तुला 99 का? जरा इकडे तिकडे हिंडणे बंद करा, आणि अभ्यासात डोकं खुपसा... या वयात लक्ष दिले नाही तर आविष्यभर चपला घासावा लागतील... जरा कट्ट्यावर जाणे सोडा.. दिवसभर फक्त फालतू मित्रांच्या घोळका.. या प्रकाराच्या गोष्टी आपण दिवसभर ऐकत राहत असाल.
 
3 अनुशासन प्रिय वडील- असे वडील घरात असताना घरातून कुठलाच आवाज येत नसतो. परंतू हे घरातून बाहेर पडले की आपण मोकळा श्वास घेता, म्युझिक वाजवता, टीव्ही, फोन बघता... कारण त्याच्या समोर हे सर्व करण्याची आपलीच हिंमतच नसते.
 
4 आनंदी राहणारे वडील - या प्रकाराचे वडील हसत खेळत, मस्ती करत आपल्याशी गप्पा मारतात. आपल्याशी मोकळेपणाने बोलतात, खरं तर अशा वडिलाचं मुलांसोबत मैत्रीचा व्यवहार असतो.
 
5 काळजी करणारे- या श्रेणीचे वडील मुलांच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींसाठी काळजी करणारे असतात. त्यांच्या प्रत्येक कामात स्वत: हातभार लावतात. काम प्रामाणिकपणे पार पडलं की याची काळजी घेतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cup 2019: ब्लॅकमध्ये विक्री होत आहे भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकिट, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण