Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेल्फीच्या शौकिनने लावले लांब हात

Webdunia
सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. जपानमधील मनसून यांना असाच सेल्फीचा शौक जडला आहे. या सेल्फीच्या नादात त्यांनी असा एक कारनामा केला आहे की, तो पाहून प्रत्येकजण नवल करत आहे.
 
चांगल्या प्रकारचा सेल्फी काढण्यासाठी सेल्फी स्टीकची आवश्यकता असते. परंतु मनसून यांनी सेल्फी स्टीक वापरण्याऐवजी आपले हातच स्टीकसारखे लांब करून घेतले आहेत. मनसूनला पाहून वरवर असेच वाटेल. पण वास्तविक पाहता मनसून यांनी आपले हात लांब केले नसून हाताच्या आकाराची दिसणारी सेल्फी स्टीक बनवून घेतली आहे. 
 
या सेल्फी स्टीकला पाहणारी कोणतीही व्यक्ती हैराण होईल. मनसून यांचे म्हणणे आहे की, त्यांना लोकांच्या गराडय़ात असताना सेल्फी स्टीकने सेल्फी काढणे विचित्र वाटते. त्यामुळे त्यांनी हातासारखी दिसणारी सेल्फी स्टीक बनवून घेतली आहे. या सेल्फी स्टीकला हात बसवलेला असल्याने ती बसवताना मोठय़ा अथवा पूर्ण बाह्या असलेला शर्ट घालावा लागतो. मनसून यांनी सध्या तरी ही लांब स्टीक असलेला हात स्वत:साठीच बनवून घेतला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

छत्तीसगड : बिजापूरमध्ये IED स्फोट, ड्युटीवर असलेले 2 जवान जखमी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आजपासून केरळ दौऱ्यावर

धनंजय मुंडेंच्या 'टोळी'ने सरपंच देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले, मनोज जरांगे यांचा कराड आणि मुंडेंवर थेट आरोप

LIVE: धनंजय मुंडेंच्या 'टोळी'ने सरपंच देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले: मनोज जरांगे

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी, सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात शिखा राय यांना उमेदवारी

पुढील लेख
Show comments