Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लक्ष्मीची कहाणी

Webdunia
NDND
आचार्य भगवत्पाद एकदा भी‍क मागता मागता एका निर्धन ब्राह्माणाच्या घरी गेले. आचार्यांच्या रूपात एक पाहुणा आपल्या घरी आल्याचे पाहून ब्राह्मण दाम्पत्यासमोर मोठे संकट उभे राहीले. कारण त्यांना भिक्षा देण्यासाठी त्यांच्या घरात काहीही नव्हते. खूप शोधाशोध केल्यानंतर घरात एक आवळ्याचे फळ सापडले. ते त्यांनी आचार्यांना भिक्षेच्या स्वरूपात दिले. हे पाहून त्यांना त्या गरीब ब्राह्मणाची दया आली. त्यानंतर त्यांनी एका वृक्षाखाली बसून ऐश्वर्यसंपन्न महालक्ष्मीची आराधना केली. आचार्याची आराधना पाहून देवी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि तिने त्यांना विचारले की ' आपण माझी आठवण कशी केली?'

या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाची कहाणी महालक्ष्मीला सांगून त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. परंतु, त्याच्या नशीबामुळे त्याला या जन्मात धनप्राप्त होऊ शकणार नाही असे देवीने सांगितले. परंतु, या दाम्पत्याने या जन्मात माझ्यासारख्या भिक्षुकाला आवळ्याचे फळ दान करून महान पुण्य प्राप्त केले असल्याचे समर्थन आचार्यांनी केले. त्यामुळे तो धनसंपत्तीचा अधिकारी झाला आहे. म्हणून आपण त्याच्यावर अवश्य कृपा करावी.

आचार्यांच्या केलेल्या समर्थनाचे खंडन महालक्ष्मी करू शकली नाही आणि त्याचवेळी तिने त्या ब्राह्मणाच्या दारात सुवर्णाचा वर्षाव केला आणि त्याची गरीबी कायमची दूर झाली.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

पौराणिक कथा : श्री कृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट

बाजरीची इडली रेसिपी

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या,सर्दी आणि घसादुखीपासून त्वरित आराम मिळवा

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल

Show comments