rashifal-2026

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:32 IST)
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
 
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
 
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
 
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
 
गीतकार : कुसुमाग्रज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

तीन दिवसांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी ड्रोन दिसले, सुरक्षा दलांनी गोळीबार केला

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

मुंबई पोलिस हाय अलर्टवर, 15 जानेवारीला मतदान, 16 रोजी मतमोजणी

मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही मतदान करू शकाल, ही 12 ओळखपत्रे वापरू शकता

पुढील लेख
Show comments