Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

- कवी सुरेश भट

Webdunia
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
 
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
 
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
 
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
 
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

उद्योग आणि व्यवसाय जगताच्या अपेक्षा वाढल्या, दीपेन अग्रवाल म्हणाले- प्रगतीशील आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाची गरज

LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निघाल्या

बजेटपूर्वी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला, किंमत किती कमी झाली जाणून घ्या

जीबीएससाठी नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क, सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना

Bank Holidays: बँका फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बंद राहतील, सुट्ट्यांची यादी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments