Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिषासूरमर्दिनीचे प्रकटीकरण

Webdunia
WDWD
देवतांची सामूहिक आणि संघ शक्ती दुर्गेच्या अवतारामुळे शक्य झाली होती. दुर्गा सप्तशती 10/18 या अध्यायानुसार देवतांच्या तेजा‍तून महिषासूरमर्दिनी दुर्गा प्रकट झाली. भगवान शंकराच्या तेजाने देवीचे मुख प्रकट झाले. यमराजाच्या तेजाने तिच्या डोक्यावरी केस आले. भगवान विष्णूच्या तेजाने हात, चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन आणि इंद्राच्या तेजाने कटीप्रवेश निर्माण झाला होता. वरूणाच्या तेजाने मांड्या, पृथ्वीच्या तेजाने हाताची बोटे आणि कुबेराच्या तेजाने नाक प्रकट झाले होते. देवीचे दात प्रजापतीच्या तेजाने आणि तिन्ही डोळे अग्निच्या तेजाने प्रकट झाले होते. अशा प्रकारे देवी प्रकट झाली होती.

या दुर्गाशक्तीला अधिक समर्थ आणि शक्तीशाली करण्यासाठी सर्व देवतांनी आपल्या विशिष्ट प्रतिभेचे सामूहिक दान केले होते. ' दुर्गा सप्तशती'त 2 /20-32 यात म्हटले आहे, की पिनाकधारी भगवान शंकराने आपल्या त्रिशूळातून एक त्रिशूळ काढून तिला दिला, विष्णूने आपल्या चक्रापासून एक चक्र तयार करून देवीला अर्पण केले. वरूणाने शंख, अग्निने शक्ती आणि पवनाने धनुष्यबाण भेट म्हणून दिले. यमराजाने कालदंडापासून दंड, वरूणाने तलवार, प्रजापतीने स्फटिकाक्षाची माळ आणि ब्रह्मदेवाने कमंडलू भेट दिले. सूर्याने देवीच्या संपूर्ण शरीरात आपल्या किरणांचे तेज भरले. काळाने तिला चमकणारी ढाल आणि तलवार दिली. विश्वकर्म्याने अत्यंत स्वच्छ फरशा भेट दिला. जला‍धीने तीला एक सुंदर कमळाचे फूल भेट दिले. हिमालयाने प्रवासासाठी सिंह आणि सागराने रत्न समर्पित केले.

नवरात्रीची पूजा दुर्गेची असो किंवा गायत्रीची दोघींचे तत्व समान आहे. महाकालीची प्रचंड शक्ती आणि नंतर मुक्ती महासंग्राम सुरू होतो. यामध्ये विजय मिळाला तरच साधक समर्थ होतो. 'भर्गो देवस्य धीमहि' म्हणजे प्रभूचे परम तेज धारण करण्यासाठी आणि नंतर माता महालक्ष्मीची शक्ती सक्रीय होते, जी साधकाला योग, ऐश्वर्याने संपन्न करते. यानंतर साधकाच्या अंतकरणात ' धियो यो न: प्रचोदयात' अर्थात सद्ज्ञान, आत्मज्ञानाचा विकास माता महासरस्वतीच्या कृपेने उपलब्ध होते.

गायत्री महामंत्रात स्वयमेव सामायिक आहे आणि याचा विस्तार श्री दुर्गा सप्तशतीच्या तीन चरित्रात आहे. हे तीन चरित्र माता गायत्रीच्या तीन चरणांचाच विस्तार आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

Show comments