Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरस्वती नमोस्तुते

-महेश जोशी

Webdunia
WDWD
सरस्वती म्हणजे विद्येची देवता. पण तिच्याविषयीचे फारसे वाङ्मय मराठीत उपलब्ध नाही. गीतकार व कवी श्याम खांबेकर यांनी ही उणीव भरून काढली असून सरस्वतीदेवीच्या उपासकांसाठी ' सरस्वती नमोस्तुते' हा गीत रचना संग्रह त्यांनी बाजारात आणला आहे. याशिवाय या शब्दांना सुरांचे कोंदणहीघातले असून राधामोहन प्रकाशनाच्या बॅनरखाली या गीत संग्रहाच्या कॅसेट व सीडीही 'सरस्वती नमोस्तुते' या नावाने आहेत.

सृष्टीची सारी सूत्रे विद्यावर्धिनी सरस्वतीमुळेच गतीशील आहेत. गतीमुळेच आयुष्याला वेग प्राप्त होतो व वेगाची देवता श्री महालक्ष्मीसुद्धा शारदा कृपेनेच लाभते. त्यामुळे शारदेची उपासना ही श्वासाइतकीच नित्याची असायला हवी, असे खांबेकर सांगतात. ' शारदा नमोस्तुते' या गीतरचना संग्रहाचे प्रयोजन नित्य साधनेसाठी असून यात शारदाष्टक, आरती, सरस्वतीदान आणि स्मृतिपररचना यांचा समावेश आहे. शारदा अष्टकात खांबेकर म्हणतात,
कर कृपा दृष्टी।
आनंद नंदिनी, गुणवचर्स्वीनी।
सुभाग्यस्वामीनी ॥

शारदास्तवनाने ओथंबलेल्या त्यांच्या या प्रासादिक रचना मनात तरळत रहातात. शारदेच्या गतीला आळवून खांबेकर तिच्यातील उत्तुंग अशा प्रेरणा स्त्रोतांची अनुभूती चित्रित करताना म्हणतात,
गती तू पूर्ती तू। आयुष्य धारिणी
रचना रक्षिणी। सृष्टी संचालिनी॥

सरस्वतीला शब्द संचारिणी, विद्या तेजस्वीनी मात्र सर्वस्वीनी आदी रूपांनी संबोधून खांबेकरांनी तिच्या गुणरुपाचे विलोभनीय चित्र रेखाटलं आहे. गेयता, माधूर्य, लय, प्रासयुक्त रचनांमुळे ही गीते जिभेवर सहजी रूळतात. त्यामुळे ऐकताना भावसमाधी लागते. एखाद्या साधकाप्रमाणे अत्यंत प्रांजळ भावाने निर्मळ अंतह्नकरणाने खांबेकरांच्या या दहाही रचना उमलत जातात.

या रचनांची निर्मितीही अतिशय रंजक पद्धतीने झाली. भारतामध्ये श्री सरस्वतीदेवीचे एकमेव मंदिर बासर येथे असून त्यास शारदापीठ असे संबोधले जाते. हे ठिकाण औरंगाबादहून नांदेडमार्गे रेल्वेने ३६५ किलोमीटर एवढे आहे. आंध्र प्रदेशातील हे छोटेसे गाव गोदावरी नदीच्या काठावर शांत व निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. अलीकडेच खांबेकरांचा तेथे जाण्याचा योग आला. त्यावेळी शारदामातेच्या साहित्याचा मराठीत तुटवडा आसल्याचे त्यांना जाणवले. जणू आईच्या आसीर्वादाने ते झपाटाने कामाला लागले आणि अल्पावधीतच 'सरस्वती नमोस्तुते' हा गीत संग्रह तयार झाला. या गीतांची बैठक अध्यात्मिक असली तरी अंतरीच्या उर्मींना सार्थ शब्दात गुंफण्याचं सामर्थ्य शारदेकडून लाभल्याचे ते कृतज्ञतेने सांगतात.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

मुळ्याचा पाला टाकू नका, बनवा या स्वादिष्ट रेसिपी

मोसंबीचा ज्यूस पिण्याचे 7 फायदे आणि 4 तोटे,जाणून घ्या

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

Show comments