Publish Date: Fri, 05 Feb 2021 (15:05 IST)
Updated Date: Fri, 05 Feb 2021 (15:09 IST)
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भोपाळने आयटीआय अपरेंटिसच्या पदांवर भरतीसाठी योग्य उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. उमदेवारांची निवड मेरिट आधारावर केली जाईल. इच्छुक उमेदवार 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अप्लाय करु शकतात. सुमारे 300 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. भरतीसंबंधी माहितीसाठी अधिकृत वेबसाइट
bplcareers.bhel.com वर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करावे.
अर्ज प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरु असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. एखाद्या मान्यताप्राप्त शाळेतून 10 वी पास आणि आयटीआय सर्टिफिकेट धारक उमेदवार अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 14 ते 27 वर्षे आहे. वयात आरक्षित कॅटगरीच्या उमेदवारांना सुट देण्यात येईल.