Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Indian Navy Recruitment 2023: कोणत्याही परीक्षे शिवाय नौदलात नौकरीची संधी

Navy
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (14:46 IST)
Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौसेनेत अधिकारी बनण्याचे स्वपन पाहणाऱ्य तरुणांसाठी नौदलात अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने जून 2024 अभ्यासक्रमासाठी 224 शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स (एसएससी ऑफिसर)  भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावे. उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinIndianavy.gov.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.
तपशील जाणून घ्या .
 
पदांचा तपशील -
या भरती मोहिमेअंतर्गत 224 रिक्त पदासाठी भरती सुरु आहे.  
शिक्षण शाखेसाठी 18, तांत्रिक शाखेसाठी 100 आणि कार्यकारिणीसाठी 106 जागा आहेत.
सामान्य सेवा {GS(X)/Hydro Cadre}: 40 पदे
हवाई वाहतूक नियंत्रक (ATC): 8 पदे
नौदल हवाई संचालन अधिकारी: 18 पदे
पायलट: 20 पदे
लॉजिस्टिक: 20 पदे
शिक्षण: 18 पदे
अभियांत्रिकी शाखा {सामान्य सेवा (GS) }: 30 पदे
इलेक्ट्रिकल शाखा {सामान्य सेवा (GS)}: 50 पदे
नेव्हल कन्स्ट्रक्टर: 20 पदे
 
पात्रता- 
कार्यकारी शाखेच्या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयातून किमान 60% गुणांसह BE/B.Tech असावा
शिक्षण शाखेच्या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून MSC पदवी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. 
तांत्रिक शाखा: (i) ऑटोमेशनसह मेकॅनिकल/मेकॅनिकलमध्ये किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावी. 
BE/B.Tech मरीन; इन्स्ट्रुमेंटेशन; उत्पादन; एरोनॉटिक्स; औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन; नियंत्रण अभियांत्रिकी; एरो स्पेस; ऑटोमोबाईल धातूविज्ञान; मेकॅट्रॉनिक्स; इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलशी संबंधित शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. 
 
अर्ज प्रक्रिया- 
सर्वप्रथम उमेदवाराने भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
ऑनलाइन अर्ज विभागात जा आणि 'तुमचा अर्ज पूर्ण करा' या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी स्वतःची नोंदणी करा.
लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि अर्ज प्रक्रिया भरण्यास सुरुवात करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात आणि आकारात अपलोड करा.
 अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी अर्ज फी भरा.
 
 
 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Wada paav recipe : मुंबईचा वडापाव घरी बनवा, रेसिपी जाणून घ्या