Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये 2422 रिक्त पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण त्वरित अर्ज करा

Webdunia
बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (13:09 IST)
RRC Railway Recruitment, Sarkari Naukri 2022: Railway Recruitment Cell (RRC) सेंट्रल रिजनने ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये अर्ज, निवड आणि  भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात आणि 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.  
 
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासाठी  वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे, ज्यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट देण्याची तरतूद आहे. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज  शुल्क रु.100/- आहे, तर आरक्षित श्रेणीसाठी अर्ज निशुल्‍क आहे.   
 
या भरतीद्वारे मध्य रेल्वेच्या मुंबई क्लस्टरमध्ये 1659 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, नागपूर क्लस्टरमध्ये 114 पदे आणि सोलापूर क्लस्टरमध्ये 79 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन अर्ज सबमिट करताना   किंवा प्रिंट करताना काही समस्या असल्यास, उमेदवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 (रविवार आणि सुट्ट्या वगळता) 022-67453140 वर कॉल करू शकतात किंवा  act.apprentice@rrccr.com वर ईमेल करू शकतात. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments