Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती अर्ज आजपासून सुरू

Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (13:35 IST)
SBI PO Recruitment 2023 सरकारी बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI PO साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गुरुवार, 7 सप्टेंबरपासून प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन SBI PO ऑनलाइन अर्ज भरू शकतात. SBI ने एक दिवस आधी PO भर्ती 2023 साठी अधिसूचना जारी केली होती. ही अधिसूचना प्रोबेशनरी ऑफिसरच्या एकूण 2000 पदांसाठी आहे.
 
SBI PO Recruitment 2023 महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : 7 सप्टेंबर 2023 पासून सुरु
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023 पर्यंत
अर्जात सुधार करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023 पर्यंत
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत
अर्ज शुल्क भुगतान करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023 पर्यंत
 
SBI PO Recruitment 2023 शैक्षणिक योग्यता
मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी असलेले उमेदवार SBI PO भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदवीचे अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर परीक्षेला बसलेले उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी बॅचलर पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
 
SBI PO Recruitment 2023 वयोमर्यादा
पीओ भरतीसाठी अर्ज करण्यार्‍या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. 1 एप्रिल 2023 च्या आधारावर वयाची गणना केली जाईल.
 
SBI PO Recruitment 2023 अर्ज शुल्क
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना SBI PO फॉर्म भरण्यासाठी 750 रुपये भरावे लागतील. तर OBC, SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 
एसबीआई पीओ 2023 भरतीसाठी कशा प्रकारे अर्ज करावा How to apply for SBI PO 2023 Registrations
सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ sbi/careers ला भेट द्यावी लागेल.
होमपेज वर  ‘Latest announcement' अंतर्गत एसबीआय पीओ भरती लिंक यावर क्लिक करा.
आता न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि माहिती भरा.
आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करुन सबमिट करा.
आता SBI PO अर्ज शुल्क भरा.
आपण एसबीआय पीओ अर्ज पत्र डाउनलोड करुन प्रिंटआउट घेऊ शकता.

संबंधित माहिती

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

Cardio Exercise करताना तुम्हाला गुडघेदुखी होते का? या 10 टिप्स वापरून पहा!

Negative Thinking: नकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे शरीरात हे 5 आजार होतात

Anniversary Wishes For Wife In Marathi पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

5 प्रकारचे चहा आरोग्यासाठी फायदेशीर

पुरळ आले आहेत का? कडुलिंबाचे 2 फेसपॅक करतील मदत, त्वचा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments