Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..आता क्रेझ प्रिंटेड पॅण्टची

Webdunia
मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (00:14 IST)
प्रत्येक जण आपापल्या स्टॉइलनुसार लूक बदलत असतात. त्यानुसार वेगवेगळय़ा कपड्यांची फॅ शन निघत असते. एखादी फॅशन बाजारात आली की त्याच फॅशनची क्रेझ सर्वत्र दिसत असते. पॅण्टमध्ये जीन्स किंवा फॉर्मल असे दोनच प्रकार होते. आता बाजारात प्रिंटेड पॅण्ट व त्यावर इनर व इनर वरून जॅकेट घालण्याची फॅशन आहे.

जिकडेतिकडे तुम्हाला असेच कपडे परिधान केलेले दिसतात. ही पॅण्ट थोडी स्किनला फिट असते. त्यामध्ये निळय़ा, हिरव्या, पांढर्‍या पॅण्टवर गुलाबी, पिवळी अशा विविध कलर्समध्ये फुले उपलब्ध आहेत.

ज्या मुलींना जीन्स घालणे आवडत नाही त्या मुलींसाठी हा वेगळा पर्याय आहे. या पॅण्ट सहलीसाठी किंवा मौजमस्तीच्या ठिकाणी घालण्यासारख्या आहेत, मात्र तरुणी त्याचा वापर कॉलेज, नोकरी, बाजारात फिरताना, घरात करताना दिसत आहे. या पॅण्टची किंमत ३५0 पासून ५00 रुपयांपर्यंत आहे. या पॅण्टवर जर तुम्हाला इनर व जॅकेट घालायचे नसेल तर शॉर्ट फॉर्मल शर्टही घालू शकता.

तसेच अशा पॅण्टमध्ये अजून एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे लेगिंग्झ. लेगिंग्झ इलेस्टीक किंवा जीन्ससारखी असते. ती घालायला एकदम हलकी असते. लेगिंग्झच्या खिशाला व खाली पायाला चेन असते. हा थोडा फं क्की लूक आहे. पण तरुणाईला फॅ शनच्या नावाखाली काहीही घालायला आवडते, हे या पॅण्टवरून दिसते. या लोवेस्टही असतात. ही पॅण्ट तुम्हाला लांबून पाहिली तर नाईट सूटसारखी वाटते. मात्र जवळून तिचा लूक जीन्ससारखाच आहे. आता बाजारात या लेगिंग्झची चलती आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments