Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकटेपणा आरोग्यास हानिकारक

संदीप पारोळेकर
NDND
' व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो', असे प्रसिध्द लेखक व. पु. काळे यांनी त्यांच्या 'पार्टनर' पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत असतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.

एकाकीपणा हा आपल्याला दु:खाशिवाय काहीच देऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडत असतो. एकाकीपणामुळे रक्तदाब वाढून मोठा तणाव निर्माण होत असतो. त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो. काही अंशी तर वेडेपणा ओढवून घेण्यासही एकाकीपणाच कारणीभूत असतो.

एकटेपणा आपल्या इच्छाशक्तीवर आघात करत असते. परिणामी आपला आत्मविश्वास कमी डगमगतो. स्वाभाविक आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर एक धूम्रपान करणारी व्यक्ती व धूम्रपान न करणारी व्यक्ती यांच्या जो फरक असतो, तोच फरक एकाकी राहणे पसंत करणारा व्यक्त व गर्दीत वारणारा व्यक्ती यांच्यात आहे.

एकाकीपणा हा केवळ आपल्या मनावरच नाहीतर तर त्याच्या शरीरावरही आघात करत असतो. शरीरात रक्त संचारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे आपण नेहमी चारचौघात राहिले पाहिजे. मनातील विचार मनात न ठेवता ते इतराजवळ बोलून दाखवले पाहिजे. त्यामुळे मन हलकं होतं आणि तणावही कमी होतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

Bones Sound हाडातून येत असेल आवाज तर हे पदार्थ खाणे सुरु करा

चिकन मेयो सँडविच रेसिपी

आरोग्यवर्धक पनीर लाडू रेसिपी

गरोदरपणात जंक फूड खाणे धोकादायक असू शकते, जाणून घ्या

डाळिंब आणि दही फेस पॅक चेहऱ्याला गुलाबी चमक देईल,कसा बनवायचा जाणून घ्या

Show comments