Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही?

Webdunia
नववीत गेलेल्या लेकीने आयब्रोज करण्याचा हट्ट धरणे हा आजकालच्या आयांसाठी नवा अनुभव नाही. पण वयात येणार्‍या आपल्या मुलीला आत्तापासूनच या ब्युटी ट्रीटमेंटची सवय लावावी की नाही अशी त्यांची द्विधा मन:स्थिती होऊन जाते. ब्युटी पार्लरमध्ये येणार्‍या मुलींचे वय दिवसोंदिवस कमी होत चालले आहे. पूर्वी कॉलेजमध्ये गेल्यावर पार्लरमध्ये जायची सवय असलेल्या मुली आता शाळेत असतानाच या सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्‍समध्ये तरबेज झालेल्या दिसतात. त्यांना घेऊन येणार्‍या आया मात्र खूप कन्फ्युज दिसतात. लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य नाही हे वास्तव एकीकडे त्रास देत असतं, तर दुसरीकडे मुलीचा हट्ट, समवयस्क मुलींकडे पाहून तिला अशा गोष्टींचं वाटणारं कुतूहल आणि मुलगी सुंदर‍ दिसावी अशी इच्छा असा सगळाच गोंधळ आईच्या मनात सुरू असतो. काही ब्युटी ट्रीटमेंट्‍सनी मुलींचा आत्मविश्वास वाढत असला तरी या ट्रीटमेंट्‍ससाठी तिनं एक विशिष्ट वय पूर्ण केलेलं असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर त्याचे दुष्परिणाम मुलीलाच भोगावे लागतात. कोणत्या ट्रीटमेंट कोणत्यावयात कराव्यात, त्याचे फायदे-तोटे याची माहिती जाणून घेऊ.

आयब्रोज 
शक्य तितक्या उशिरा करणं चांगलं. लहान वयातच आयब्रोज करायला सुरुवात केल्यान डोळ्यांवरची त्वचा सैल पडते. सुरकुत्याही येतात. 

वॅक्सिंग 
वॅक्सिंग वयाच्या तेरा-चौदा वर्षापासून करता येईल. मात्र, ते वरचेवर करू नये. तीन ते चार महिन्यांतून एकदा करावं. नाहीतर त्वचेवर डाग पडतात. त्वचा तेलकट असल्यास पुरळ येण्याची शक्यता तपासून मगच वॅक्सिंग करावं. ब्लॅक हेड्‍सही या वयात काढले तरी चालतात. हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग- पर्मनंट कलर, स्ट्रेटनिंग टाळाच. त्याऐवजी कलर स्प्रे वापरता येईल पण कायम नाहीच.

ब्लिच 
दहावीचया सेंडऑफ पार्टीत गोर दिसावं म्हणून खूप मुली ब्लिच करून घेतात. हे अत्यंत हानिकारक आहे. लहान वयात, त्वचा नाजूक असताना ब्लिच केल्यास ती कायमची काळी पडू शकते.

फेशियल 
किमान पंचविसाव्या वर्षापर्यंत फेशियल टाळलेलंच बरं. 
 
पिंपल ट्रीटमेंट 
वयात येताना पिंपल्स येणं ही सामान्य घटना आहे, मात्र 16व्या वर्षापर्यंत त्यावर ट्रीटमेंट घेऊ नये. त्याआधी काही करायचे झाल्यास हर्बल किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी. रसायनयुकत ट्रीटमेंट अजिबात घेऊ नये.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

चायनीज चिकन रेसिपी

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी

पुढील लेख
Show comments