Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल कव्हरची क्रेझ

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (12:59 IST)
फॅशनच्या दुनियेत प्रत्येकजण स्वतःला सर्वच बाबतीत 'टीपटॉप' ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बदलत्या काळात अनेक ठिकाणी ट्रेंडी फॅशनमधील वस्तू वापरात येऊ लागल्या आहेत. यामध्ये मोबाइल कव्हरचाही समावेश आहे. मोबाइल कव्हरमध्ये रबर, प्लॅस्टिक आणि तत्सम मटेरियल वापरात येते. पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यावरील चित्रे, प्रिंट, ट्रान्फरन्टपणा याचा विचार केला जातो.
 
पान, फूल, केशरचना, लिपस्टिक, मॅक्सी ड्रेस, नाजूक नक्षीकाम अशा डिझाइनची चलती स्त्रिया आणि युवतींमधून पाहावयास मिळते. तर पुरुष मंडळीही काही मेसेज, काही शब्द, चित्रे यांचा समावेश असणारी कव्हर वापरू लागले आहेत. बरेचजण पारदर्शक कव्हरला पसंती देतात. यातून मोबाइल आणि कंपनी त्यातून दुसर्‍याला आपली ओळख होऊ शकते, असा त्यांचा समज असतो. सध्या युवावर्गात जितकी सेल्फीची क्रेझ वाढत चालली आहे तसेच मोबाइल बॅक कव्हर बाबतही आवडी- निवडी सतत बदलत्या आहेत. जसे आपण अनेक प्रकारचे आणि डिझाइन रंगांचे शर्ट परिधान करतो. अगदी तशाच मोबाइलचे बॅक कव्हर्सच्यासुद्धा अनेक व्हरायटी आपल्या जवळ असाव्यात. आपले कपडे, जिथे जायचे आहे ते ठिकाण आणि कार्यक्रम यांचा विचार करून बॅक कव्हर्सचा बदल करून वापर वाढत चालला आहे.
 
सध्या मोबाइलपेक्षा लांबून तुमच्या मोबाइलचे बॅक कव्हरच तुमचे लक्ष वेधून घेत असते, त्यामुळे ट्रेंडी लूक असणार्‍या कव्हर्सची चलती आहे. अलीकडे पावसाळी मोसमात वापरता येतील असे वॉटरप्रूफ बॅक कव्हर्सही उपलब्ध झाले आहेत. सध्या विशेषतः युवकांत मोबाइल बॅक कव्हर्सवर शिवाजीराजे अधिक लोकप्रिय आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments