Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डस्की त्वचे साठी या फॅशन टीप्स अवलंबवा

डस्की त्वचे साठी या फॅशन टीप्स अवलंबवा
, बुधवार, 3 मार्च 2021 (08:20 IST)
व्यक्तिमत्त्वाला मोहक आणि आकर्षक करण्यासाठी परिधानाचे महत्त्व आहे. पोशाखाचा रंग, पेटर्न, फॅब्रिक,आणि स्टाइल असा असावा जो आपल्यावर छान दिसेल. त्यामुळे आपल्याला स्मार्ट लूक मिळेल. 
डस्की म्हणजे सावळी त्वचेसाठी जेवढे आवश्यक मेकअप आहे तेवढेच आवश्यक परिधान देखील आहे. या मुळे आपल्या व्यक्तिमत्त्वा बद्दल समजते. या साठी आम्ही काही खास टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून डस्की त्वचेच्या मुली आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारआणू शकतात. 
 
* गडद चमकदार रंगांचा वापर करू नका. पिवळा, नारंगी,निऑन सारखे रंग वापरू नका. हे गडद आणि चमकदार रंग आहे जे सावळ्या रंगावर चांगले दिसत नाही. फिकट आणि स्किन टोनला साजेशी रंग जास्त छान दिसतात. आपण प्लम,तपकिरी,फिकट गुलाबी,लाल या सारखे रंग घालू शकता.
 
* जेव्हा गोष्ट येते फॉर्मल लूकची तेव्हा बेज रंगाचा साधा शॉर्ट ड्रेस घालू शकता. ज्यामध्ये प्रिंटचे काम केले गेले आहे. अशा शॉर्ट ड्रेस सह हाय हिल्स, स्मार्ट वॉच आणि कोट घालून ऑफिस लूक केले जाऊ शकते. सैल्मन पिंक रंगाचा व्यवस्थित फॉर्मल पोशाख चांगला दिसेल. 
 
* डेनिम रंगाचे कपडे घालावे, जसे की डेनिम जीन्स, प्लाझो, डेनिम शर्ट, इत्यादी.
 
* आपण कपड्यांच्या फॅब्रिक सह खेळून देखील आकर्षक देखावा मिळवू शकता.  
 
* काळ्या रंगाची शॉर्ट ड्रेस घालत असाल तर त्यावर नेट शिफॉन सारखे फॅब्रिक्स असल्यावर हे आपल्या सौंदर्याला खुलवतील.
 
* ब्लिंगी गोल्ड आपल्यासाठी चांगले असू शकते. गौण घालणे आवडत असेल तर लाल रंगाचा फ्लोरलेन्थ गाउन घालू शकता. ऑफशोल्डर्स, शोल्डरलेस,सिंगलशोल्डर असे गाउन छान दिसतील. यांच्या सह केस स्ट्रेट ठेवा. 
 
* फॉर्मल्स ची गोष्ट असलेलं तर आपल्यासाठी बरेच काही आहे. हायवेस्ट जीन्स सह सॉलिड ट्विस्ट टॉप घालू शकता. या साठी केस बांधून ठेवू  शकता. 
 
* पेन्सिल स्कर्टसह फिकट मिंट रंगाची रूफल स्ट्रिप्ड टॉप घाला, केसांना मोकळे सोडा. साध्या इयरिंग सह लूक कॅरी करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्तनपान करताना या गोष्टींची काळजी घ्या