Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॅशन करायला वयाचे बंधन नाही.

fashion edit
, सोमवार, 12 जून 2023 (09:00 IST)
असं म्हणतात की वयोवृद्ध लोकांनी किंवा वय झालेल्या लोकांनी फॅशन करू नये. परंतु सध्याच्या आधुनिक आणि बदलत्या काळात या.जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना काहीच अर्थ नाही.आजची जीवनशैली म्हणते की फॅशनेबल असण्याच्या वयानुसार काहीच संबंध नाही.वयाच्या 60 व्या वर्षी देखील बायका असं फॅशन करतात जे त्यांना वयाच्या 30 व्या वर्षी करायला पाहिजे.आता या गोष्टीची चेष्टा कोणी करत नाही. उलट सगळे कौतुक करतात की या वयात देखील किती चांगले राहतात, किती चांगले ड्रेस घातले आहे.
फॅशन करण्यासाठी देखील काही गोष्टी लक्षात ठेवायचा असतात जेणे करून कोणी टिंगल टवाळी करू नये. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* व्यक्तिमत्त्वाला साजेशा पोशाख घाला-
फॅशन ट्रेंड मध्ये राहण्यासाठी वयाची काही मर्यादा नाही. मोठ्या वयाचे लोकं देखील फॅशन ट्रेंड सह फॅशन करायला घाबरत नाही. त्यांच्या वर कपडे चांगले दिसतील त्याला साजेसं आपले आहार, मेकअप कडे देखील योग्य लक्ष देतात. सरत्या वयात देखील लोकं पूर्ण आत्मविश्वासाने फॅशनेबल आऊटफिट्स घालतात.
आऊटफिट्सचं नव्हे तर त्याच्या रंगाला घेऊन देखील सहज असतात. लक्षात घेण्यासारखे असं की आपण जे काही घालाल त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व छानं दिसायला पाहिजे. या साठी वेळेनुसार आणि वातावरणानुसार पोशाख निवडावे. 
 
* गडद कपड्यामुळे वय लपत नाही-
बऱ्याच लोकांचे मत आहे की गडद कपडे घातल्यामुळे वय लपते. असं काही नाही.फॅशनेबल आऊटफिट घालताना असा विचार करू नका की वय लपवायचे आहे. आपण बिनधास्त होऊन सहजपणे फॅशनेबल आऊटफिट घाला.सर्वात महत्त्वाचे म्हणजे की मेकअप, वातावरण आणि ड्रेसच्या दरम्यान एक साम्य असावे. अन्यथा आपण हसण्याचे कारण बनू शकता.एखाद्या शैलीची कॉपी करण्याऐवजी स्वतःचा स्टाईल बनवा. जेणे करून आपण गर्दीमध्ये देखील वेगळे दिसाल.
   
* स्वतःला मेंटेन करा- 
जर आपल्याला फॅशनेबल आऊटफिट्स घालायचे आहे तर या साठी स्वतःला मेंटेन करा.वेळीच केस कापणे,नखे कापणे त्यांना शेपमध्ये ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की सरत्या आणि वाढत्या वयात दातांची निगा राखणे देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. शरीर फिट तर सर्व फिट असं म्हणतात. या साठी निरोगी राहा, शरीरानुसार वर्कआउट करा. असं केल्यानं तंदुरुस्त राहत जे आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुधारण्याचे काम करत. ट्रेंडी आऊटफिट्स घालण्यासह आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या. जेणे करून तरुण लोकांना देखील आपल्याला बघून प्रेरणा मिळेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात कवठ खाण्याचे फायदे जाणून घ्या