Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टायलिश नाइटविअर

वेबदुनिया
प्रसंगानुरूप मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे आणि आवश्यकतेनुसार तर्‍हेतर्‍हेचे वस्त्रप्रकार उपयोगात आणत असतो. त्यातलाच एक प्रकार आहे नाइटविअर. हा एक असा प्रकार आहे, जो आपले स्थान केवळ टिकवूनच नाही, तर दिवसेंदिवस अधिकाधिक 'स्टायलिश' होत आहे. ज्या नाइटविअरला आपण अधिककरून गाउन या एकाच नावाने ओळखत, संबोधत असू तो आज कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसतो. 
 
कोणे एकेकाळी ज्याची सुरुवात झाली असावी, केवळ सोय व आवश्यकता म्हणून. दिवसभराच्या हर तर्‍हेच्या कपड्यांचे ओझे वागवून जीव व देह दोन्हींना जरा आराम मिळावा, यासाठी सुटसुटीत असा हा झोपतानाचा पोशाख म्हणजेच नाइटविअर. हे खरे वाटत नाही ना? तेव्हा या अपेक्षांची पूर्ती करायला रोज वापरून मऊसूत झालेला, अक्षरश: अंगवळणी पडलेला एखाद दुसरा रोजच्यातल्याच ड्रेसने तेव्हा सुरुवात झाली असावी. हळूहळू याच्याकडेही लक्ष दिले जाऊ लागले असावे. त्यामुळेच याला एक विशिष्ट रूप आले. मग त्याची अनेक रूपे झाली. आज ही रूपे शमीस, नाइट ड्रेस कप्तान, गाऊन, मॅक्सी, रॅप सेट, टॉप-शॉर्टस सेट, बेबी डॉल अशी आहेत.

शमीस हा साधारणत: सिंगल पीस असतो व लांबीला गुडघ्यांच्या थोडासा वर असतो. यातही आता टू-पीस किंवा रॅप असा आणखी एक प्रकार आला आहे.

पुढील पानावर पाहा टी शर्ट-स्लीव्हलेस...


WD

सेट म्हणजेच टी शर्ट-स्लीव्हलेस व पँट थ्री-फोर्थ असा ट्रेंड आहे. टीनएजर्ससाठी टॉप-शॉर्ट सेट विशेष करून आवडीचा होताना दिसतोय.

पुढील पानावर पाहा हॉट ब्ल्यू....


WD

रंग संगतीबद्दल ही आजकाल प्रत्येकजण 'चुझी' होताना दिसत आहे. नाइटविअरही त्याला अपवाद नाही. पांढरा, क्रीम, लायलॅक, पिंक, रेड, ब्लॅक हे झाले क्लासिक्स तर नवीन रंगांमध्ये प्लम, परपल, हॉट पिंक, अ‍ॅक्वा म्हणजेच हॉट ब्ल्यू. पांढरा, गुलाबी, यलो, ब्राउन, टरक्वॉइज या रंगांना पसंती आहे.

इतकेच नव्हे तर त्याची डिझाइन, वापरलेले मटेरिअल या गोष्टींकडे ही विशेषत्वाने लक्ष दिले जाते. ब्रायडल आणि डिझायनर नाइटविअरला सुद्धा खूप मागणी आहे यातही पॅटर्नस्बद्दल बोलायचे झाले, तर पायघोळ, हॉल्टर नेक, योक पिस, शेपली म्हणजेच जास्त घेर नसलेला, फुल, थ्री-फोर्थ हे आहेतच.

पुढील पानावर पाहा प्रिंटेड नाइटविअर....


WD

शिवाय प्रिंटबद्दल काय विचारायचे. प्लेन, टेक्सचर्ड, एम्ब्रॉयडरी, लाइट आणि ब्राइट प्रिंटेड, अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंटेड हे आहेचत, पण क्लासिक म्हणावे असे हलकेफुलके फ्लोरल व पोल्का डॉट्स आपले वर्चस्व टिकवून आहे.

नाइटविअर म्हणजे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घय बनलेला आहे. त्यामुळे त्याची 'डिमांड' रंग लाई है. तो स्टायल स्टेटमेंट ठरत आहे. यातून आपण ‍आपली निवड करावी व स्टाइल-स्टेटमेंट ठरवावे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments