rashifal-2026

This lipstick is available in five shades लिपस्टिकचे हे पाच शेड आहे चलनात

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (08:48 IST)
This lipstick is available in five shades सणवार असो वा लग्न किंवा दररोज ऑफिस जाणार्‍या मुली आणि स्त्रिया, सुंदर दिसण्यासाठी लिप्स्टिक वापरणे अगदी सामान्य आहे. मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान आहे लिपस्टिकचे, जे आपल्या ओठांना रंग देऊन लुक आकर्षक बनवण्यात मदत करतं. परंतू हे चलनाप्रमाणे वापरल्याने आपली सुंदरता अजून उठून दिसते. जाणून लिपस्टिकचे 5 शेड, जे सध्या पसंत केले जात आहे.
 
लाल- लाल रंग नेहमीच खास असतो. प्रत्येक ड्रेसवर हा कलर वापरला जाऊ शकतो. मेकअप कलरफुल असो वा न्यूड, लाल रंगाची लिपस्टिक आकर्षण वाढवते. रेडियन्ट, क्लासिक आणि वाइब्रेंट कलर्समधून आपण कोणताही शेड निवडू शकता.
 
डार्क ब्राऊन- हा रंग वेस्टर्न ड्रेसवर मॅच करतो. स्मोकी आयशेडो आणि या रंगाचे लिपस्टिक पर्फेक्ट लुक देतं. ट्रॅडिशनल ड्रेसबरोबर ट्राय करायचं असेल तर लाइट शेड वापरू शकता. आपला रंग डार्क असल्यास, हा शेड निवडणे टाळा.
 
पीच- तरुण मुलींमध्ये या रंगाचा क्रेझ आहे, याच्या ब्राइट शेड्सची पण डिमांड आहे. मॉडर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही आऊटफिट्सवर हा शेड मॅच करून यंग लुक मिळवू शकता.
 
पिंक-पर्पल- पिंक कलर सदाबहार आहे, आणि नेहमी सुंदर दिसतो. फक्त आपल्याला योग्य शेड निवडायचा आहे, आणि आपण बनू शकता पार्टीची शान. लाइट पिंक असो किंवा पर्पल, आपल्या परिधानाप्रमाणे मॅच करून लावल्यास चांगला लुक येईल.
 
न्यूड- रंग आवडतं नसल्यास न्यूड मेकअपसह मॅचिंग लिपस्टिक उत्तम पर्याय आहे. सध्या न्यूड कलर्स ट्रेंडमध्ये आहे आणि पसंत केले जात आहे. आपण बिंदास ट्राय करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

पुढील लेख
Show comments