बांबू
फेंगशुईत बांबूच्या झाडाला खूप महत्त्व आहे. याने धन लाभ व्यतिरिक्त घरातील वातावरण देखील सकारात्मक राहतं. याने मानसिक ताण कमी होतो. बांबू घर किंवा ऑफिसच्या टेबलावर अशा प्रकारे ठेवा ज्यावर खूप उजेड पडत नसेल.
एरिक पाम
एरिक पाम आपल्या जवळीक वातावरण शुद्ध ठेवतं. याने शरीराला शुद्ध वारं मिळतं ज्याने मेंदू शांत राहतं. यामुळे हाय बीपीसह अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
पीस लिली
कामाचा थकवा जाणवू नये यासाठी पीस लिलीचं झाड लावावं. थकवा जाणवत असल्यास यांच्या फुलांना बघावे, आपोआप सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि फ्रेश वाटू लागतं. हे झाड देखील हलक्या उजेडातच चांगला वाढतं.
गुलाब, चंपा, चमेली
झाडं आणि फुलं आजारापासून मुक्ती देण्यासाठी मदत करतात. आपण घरात फुलांचे झाडं लावल्यास ताण दूर होण्यास मदत मिळते.