Publish Date: Tue, 03 Dec 2019 (10:57 IST)
Updated Date: Tue, 03 Dec 2019 (10:59 IST)
तसं तर पैसा कमावण्यासाठी मेहनत केल्याशिवाय इतर पर्याय नाही परंतू अनेकदा मेहनत करून देखील मनाला पटण्यासारखे परिणाम हाती लागत नाही. घरात आर्थिक समस्या असेल तर वास्तुप्रमाणे मनी प्लांट लावणे खूप सामान्य उपाय सांगण्यात येतो परंतू आपण क्रासुला प्लांट बद्दल ऐकले आहे का ज्याला मनी ट्री देखील म्हटलं जातं.
या प्लांटसाठी अधिक जागेची गरज नाही. घरात सावलीत देखील क्रासुला ची देखभाल करता येऊ शकते. फेंगशुई प्रमाणे हे रोप घरात ठेवल्याने पैशाला आकर्षित करतं. क्रासुला एक पसरणारे झाडं आहे. याचे पाने रुंद असतात आणि स्पर्श केल्यावर मखमली वाटतात. या झाडाच्या पानांचा रंग न पूर्णपणे हिरवा आणि न पिवळा असा आहे. मिश्रित रंगाचे पान इतर पानांसारखे कमजोर नसतात.
मनी प्लांटप्रमाणेच क्रासुला घरात सावलीत देखील वाढू शकतं. याला अधिक जागेची गरज नाही. आपण हे रोप लहानश्या कुंड्यात लावू शकता. फेंगशुईप्रमाणे क्रासुला सकारात्मक ऊर्जेसह धन देखील आकर्षित करतं. हे रोप घराच्या प्रवेश दारावर लावावं. दाराच्या उजव्या बाजूला ठेवावे. याने घरात सुख-समृद्धी आणि शांती कायम राहील.