Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवळा नवमी महत्त्व आणि पूजा विधी

Amla Navami Date
Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:00 IST)
कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते. याला अक्षय नवमी देखील म्हणतात. या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. 
 
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी स्नान, पूजन, तरपण आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते. देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्तीसाठी देखील ही पूजा केली जाते.
 
या दिवशी काय करावे
आवळा नवमीच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. यामुळे ओवती-भोवती असलेली नकारात्मक उर्जा नष्ट होते. 
 
स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मी आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करावी.
 
आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून 'ॐ धात्र्ये नम:' मंत्र जपत आवळ्याच्या झाडाच्या मुळात दुधाची धार सोडत पितरांना तरपण करावे.
 
कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करून प्रदक्षिणा घालावी.
 
पूजा-अर्चना केल्यावर खीर, पुरी, भाजी आणि मिठाईचं नैवेद्य दाखवावा.
 
आवळ्याच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्या. याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे.
 
आवळ्याच्या झाडाखाली विद्वान ब्राह्मणांना भोजन घालून दक्षिणा द्यावी.
 
स्वत: झाडाखाली बसून भोजन करावे.
 
या दिवशी आवळ्याचं झाडं घरी लावणे शुभ मानले गेले आहे. तसं तर पूर्व दिशेत मोठे झाडं लावू नये परंतू या दिशेत आवळ्याचं झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जेचं प्रवाह वाढतो. तसेच घराच्या उत्तर दिशेला देखील हे झाड लावणे योग्य ठरेल.
 
या दिवशी पितरांच्या शीत निवारणासाठी हिवाळ्यातील कपडे व ब्लँकेट्स दान करावे. या दिवशी केलेलं दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरतं.
 
मुलांची स्मरण शक्ती वाढावी किंवा ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अशा मुलांच्या पुस्तकात आवळा आणि चिंचेच्या झाडाचे हिरवे पाने ठेवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महादेव आरती संग्रह

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

आरती सोमवारची

Easter Sunday 2025: ईस्टर संडे कधी साजरा केला जाईल? इतिहास जाणून घ्या

Easter 2025 Wishes In Marathi ईस्टरच्या शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments