Marathi Biodata Maker

भुलाबाईची आरती Gulabai Aarti Marathi

Webdunia
सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (19:49 IST)
केळीच्या पानावर उगवला दिवस 
उगवला दिवस
आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस
कितवा दिवस
आज आमच्या गुलाबाईला .... दिवस
.... दिवस
... व्या दिवशी बाळाला टोपरं टोपरं
मोत्यानं गुंफलं जो बाळा जो जो रे
 
भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेरा माहेरा ।
गेल्या बरोबर पाट बसायला बसायला। विनंती करून सरस्वतीला सरस्वतीला।
सरस्वती सरस्वती जगदंबे जगदंबे । फुल चढवा बेगंबे बेगंबे।
बेगंबेचा आकडा आकडा । सुटला घोडा वाकडा वाकडा ।
या घोड्याचा लांब पाय लांब पाय।
त्यावर बसले गुलोजी राय गुलोजी राय ।
 
गुलोजींना आमचा नमस्कार नमस्कार ।
शुभ्र पौर्णिमा शुभ्र दिनी शुभ्र दिनी ।
अर्चन पूजा करु आम्ही करु आम्ही ।
 
सर्व मुली गोळा झाल्या झाल्या । 
टिपर्‍या मध्ये गुंग झाल्या झाल्या ।
आरती संपली आणा बाई खिरापत खिरापत 
आणावी शंकराने शंकराने
वाटावी पार्वतीने पार्वतीने 
प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई घरी जाऊ
प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई घरी जाऊ
गुलोजी राणाची आरती गाऊ

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chaitra Gauri Naivedya चैत्र गौरीच्या नैवेद्यातील मुख्य पदार्थ पाककृती

Chaitra Gauri 2026 Wishes In Marathi चैत्र गौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Ramadan Eid Mubarak 2026 Wishes In Marathi रमजान ईद शुभेच्छा संदेश

Chaitra Gauri 2026 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

Shriram Navami 2026 महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक श्रीराम मंदिरे

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments