Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rishi Panchami 2023 ऋषिपंचमी पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त

Webdunia
मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (16:34 IST)
Rishi Panchami 2023 भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या गणेश चतुर्थीनंतर ऋषीपंचमी हा मोठा सण साजरा केला जातो. कुळ परंपरेनुसार तो प्रत्येक कुळात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी ऋषीमुनींसोबतच लोक त्यांच्या कुलदेवता आणि नागदेवतेचीही पूजा करतात. पूजेची पद्धत आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. बुधवारी 20 सप्टेंबर 2023 रोजी उदयतिथी प्रमाणे हे व्रत केले जाणार आहे.
 
पंचमी तिथी प्रारंभ : 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01 वाजून 43 मिनिटापासून प्रारंभ.
पंचमी तिथी समाप्त : 20 सप्टेंबर 2023 दुपारी 02 वाजून 16 मिनिटापर्यंत.
नोट : स्थानीय वेळेनुसार तिथीच्या वेळात 2 ते 5 मिनिटचा फरक पडू शकतं.
 
पूजा शुभ मुहूर्त :-
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:56 ते दुपारी 12:45 पर्यंत।
विजय मुहूर्त: दुपारी 02:22 ते 03:11 पर्यंत।
गोधूली मुहूर्त: संध्याकाळी 06:27 ते 06:50 पर्यंत।
सन्ध्या मुहूर्त : संध्याकाळी 06:27 ते 07:37 पर्यंत।
रवि योग : सकाळी: 06:14 ते दुपारी 01:48 पर्यंत।
 
का करता ऋषिपंचमीची पूजा?
ऋषी पंचमीला ऋषी कश्यप यांची जयंती आहे.
या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते.
या दिवशी महिला कुटुंबातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी व्रत करतात.
गृहस्थाश्रमी पुरुष आचारसंपन्न व्हावा या हेतूने हे व्रत असतं. 
स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे निरसन होऊ शकते असे मानले जाते.
 
सप्तऋषि पूजन का मंत्र -
'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥
दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः'॥
 
ऋषि पंचमी पूजा विधी
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते.
या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात, स्नान वगैरे करतात आणि सप्त ऋषींच्या पूजेची तयारी करतात.
त्यासाठी भिंतीवर किंवा जमिनीवर हळदीने सात ऋषींची आकृती काढून पूजा करतात.
घराच्या स्वच्छ ठिकाणी हळद, कुंकू, रोळी इत्यादींचे चौकोनी वर्तुळ करून त्यावर सप्तऋषी बसवा.
सुगंध, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी पूजा केल्यानंतर सप्तऋषींना पुढील मंत्राने अर्घ्य द्यावे.
 
सप्तऋषि पूजन मंत्र -
'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥
दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः'॥
ALSO READ: Rishi Panchami Katha ऋषिपंचमीची कहाणी
या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments